Shiv Temple CCTV Footage: मध्य प्रदेशातील रतलाम येथील शिव मंदिरातून दोन चोरटे भगवान शिवाचे नाग आणि जलधारी चोरताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना मनुनिया गावातील मनुनिया महादेव मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये डोके झाकलेले आणि हातमोजे घातलेले दोन पुरुष भगवान शिवाचा नाग आणि जलधारीला काठीने घेऊन जाताना दिसत आहेत. शिवलिंगाच्या सजावटीत वापरलेले सोने-चांदीचे साहित्यही त्यांनी नेले. तसेच, त्यांची नजर दानपेटीवर होती, मात्र त्यानंतर त्यांना त्यात यश मिळू शकले नाही.

मंदिरातील चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

@KashifKakvi नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ‘शिव देवाचा नाग आणि जलधारी चोरांनी चोरले. मध्य प्रदेशातील रतलाम येथील शिव मंदिरातील सीसीटीव्ही. मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांची नजर असली तरी दोन्ही चोरट्यांना दानपेटीचे कुलूप तोडता न आल्याने त्यांना त्यात यश आले नाही.

सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे

या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी तालुका नगर येथे संप पुकारला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पाटीदार समाजाने एसडीएम मनीषा वास्के यांना निवेदन देऊन चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रशासन आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

Story img Loader