Mumbai Bandra Sea Link Accident: नुकताच महाराष्ट्रातील मुंबईतील सी लिंकवर झालेल्या एका भीषण रस्ता अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये टॅक्सीने एका ४३ वर्षीय व्यक्तीला टक्कर दिली. या अपघातात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर, अपघातात जखमी झालेल्या या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका पक्षाचा जीव वाचवण्यासाठी ती व्यक्ती गाडीतून खाली उतरली होती आणि नंतर त्याचाच अपघात झाला.

कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने जखमी गरुडाला कारमधून वाचवण्यासाठी कार थांबवली तेव्हा हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तेवढ्यात दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या एका टॅक्सीने त्याला आणि त्याच्या चालकाला जोरदार धडक दिली. टक्कर एवढी जोरदार होती त्यामुळे ते दोघेही हवेत फेकेल गेले.

36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
27 year old Punekar woman died in in paragliding accident in goa
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “आपल्याला एन्ट्री आवडलीय…”, डॅडी पुष्पाकाकीच्या मदतीने सूर्याविरुद्ध पुन्हा कट करणार; पाहा, मालिकेतील ट्विस्ट….

(हे ही वाचा: ‘या’ Optical Illusion फोटोत लपलेत आहेत दोन वाघ; दुसरा तुम्ही शोधू शकता?)

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अमरच्या कुटुंबीयांना टॅक्सी चालकावर कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाहीये. सध्या वरळी पोलिसांनी टॅक्सीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर अमर यांचा चालक श्याम सुंदर कामत हेही या अपघातात जखमी झाले असून, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अमर प्राणी-पक्षांबद्दल अत्यंत संवेदनशील होता, असे सांगितले जात आहे. ते अनेकदा पक्षी आणि प्राण्यांना मदत करत असे. त्यांच्या गाडीखाली गरुड आला असता, त्यावेळी त्यांनी त्यांचा चालक श्याम सुंदर कामत याला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यांच्यासोबत गाडीचा चालकही गरुडाच्या मदतीसाठी खाली उतरला होता तेव्हाच हा अपघात झाला.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोतला बिबट्या तुम्ही शोधू शकता का? बघा प्रयत्न करून)

(हे ही वाचा: Viral Video: ‘या’ व्यक्तीने हातात एकत्र पकडले असंख्य जिवंत साप; व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांचा विश्वास बसेना!)

गेल्या महिन्यात झाला होता अपघात

अमर एनपीएनसी रोडवर असलेल्या सोसायटीत राहत असून ते काही कामानिमित्त मालाडला जात असताना हा अपघात झाला. त्यासाठी त्यांनी सी लिंकचा मार्ग निवडला होता. ही घटना गेल्या महिन्याच्या ३० तारखेची आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमरचा चालक कामत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Story img Loader