Gujarat car accident: सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असतील, जे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
गुजरातच्या सूरतमध्ये हिट अँड रनची एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. डिंडोली क्षेत्रात एक कार आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. यानंतर दुचाकी कारच्या खाली आली आणि तशीच अडकली. पण यानंतरही चालकाने कार थांबवली नाही. त्याने 800 मीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली. सुदैवाने कारने धडक दिल्यानंतर चालक दूर फेकला गेला होता. यामुळे त्याची जीव वाचला. पण चालक दुचाकी फरफटत नेत असल्याचं पाहून रस्त्यावर उभे नागरिक आश्चर्याने पाहत होते. यातील काहीजण कारच्या दिशेने धावतही सुटले होते. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
दुचाकी अडकलेली असतानाही चालकाने थांबवली नाही कार
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक ग्रे रंगाची ब्रेझा कार रस्त्यावर वेगाने धावत आहे. यादरम्यान कारच्या चाकाखालून ठिणग्या उडताना दिसत आहेत. जवळपास ८०० मीटपर्यंत हा प्रकार सुरु होता. कारच्या खाली दुचाकी अडकलेली असतानाही चालकाने कार थांबवली नसल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नाही. पण घटनेची माहिती मिळाल्यानंतर डिंडोली पोलीस ठाण्याची पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाली होती. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. पण त्यानेही पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. धडकेनंतर आपण लांब जाऊन पडलो होतो, त्यामुळे या जखमा झाल्याचं दुचाकीस्वाराने सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ‘लाइक करो पैसा कमाओ’चा मेसेज अन् एका रात्रीत १२ लाखांचं नुकसान; पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची फसवणूक
जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतो. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. त्यामुळे रस्ते अपघात हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे.