आजकाल जिममध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्याची संख्या कमालीची वाढली आहे. वाढते आजार आणि संक्रमण यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोकांचा जिमकडे ओढा वाढत आहे. सध्या सोशल मीडियावर जिममध्ये व्यायाम करायला आलेल्या महिलांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्यायाम करतानाचा नाही, तर जिममध्ये हाणामारी करतानाचा आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण या भांडणामागचं कारण आता समोर आलं आहे. एक लहानशा गोष्टीवरून या दोन महिला आपापसात भिडल्या. जिमच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली आहे. त्याचं झालं असं, जिममधील एक महिला बऱ्याच वेळापासून स्मिथ मशीनवर व्यायाम करत होती. तिच्या शेजारी एक महिला तिची पाळी येण्याची वाट पाहत होती. त्या महिलेचा व्यायाम संपल्यावर, वाट बघत असलेली महिला पुढे जाणार, इतक्यातच मागून दुसरी महिला आली आणि तिला धक्का दिला. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Sanju Samson statement that success comes from learning to handle failure and pressure sports news
अपयश, दडपण हाताळण्यास शिकल्याने यश -सॅमसन
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Health Benefits of Daily Hugs
तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक… कारणे कोणती? परिणाम काय?
Borderline Personality Disorder BPD among youth
स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
freedom party Austria
ऑस्ट्रियामध्ये राजकीय भूकंप… ‘नाझी’वादाची पार्श्वभूमी असलेला अतिउजवा पक्ष सत्तेच्या वाटेवर… युरोपचा राजकीय रंगमंच बदलणार?
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!

अतिशहाणपणा नडला! सिंहाच्या पिल्लाला कुरवाळायला गेला अन् पिल्लाने चांगलाच धडा शिकवला; पाहा धक्कादायक Viral Video

या व्हिडीओमध्ये एक महिला स्मिथ मशीनवर व्यायाम करत होती. तिच्याच शेजारी असलेली काळ्या रंगाचे टीशर्ट घातलेली महिला आपल्या पाळीची वाट पाहत होती. मात्र, व्यायाम करणारी महिला उठताच वेगळीच महिला तेथे आली आणि वाट पाहत असलेल्या महिलेला धक्का देऊन त्या मशीनवर आपला व्यायाम सुरू करण्याचा प्रयत्न करू लागली. यानंतर त्या दोन्ही महिलांनी एकमेकांचे केस ओढून मारामारीला सुरुवात केली. धक्क्यापासून सुरू झालेल्या या वादाने काही क्षणातच गंभीर रूप घेतले. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर महिलांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला.

भगवान शंकराच्या मंदिरात नतमस्तक झाली शेळी; भक्तीचे अनोखे रूप दाखवणारा हा Viral Video पाहाच

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजरने म्हटलंय, “या भांडणात खूप कॅलरी बर्न झाल्या असतील.” तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, “मजबूत केसांसाठी उत्कृष्ट वर्कआउट” तथापि, या भांडणात कोणत्याही महिलेला गंभीर दुखापत झालेली नाही.