Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. काही व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे पण कोणीही तिला एक रुपया सुद्धा देत नाही पण पुढे या वृद्ध
महिलेबरोबर असं काही घडते, की ते पाहून तुम्हीही भावुक व्हाल. नेमकं या महिलेबरोबर काय करते, हे आज आपण जाणून घेऊया.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वृद्ध महिला रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये थांबलेल्या गाड्यांजवळ जाऊन भीक मागताना दिसत आहे. पण या वृद्ध महिलेला कोणीही मदत करत नाही. पुढे तुम्हाला दिसेल की ही वृद्ध महिला एका रस्त्याच्या कोपर्‍यात शांतपणे बसलेली आहे आणि एक व्यक्ती तिच्या मागून येते आणि तिच्या अंगावर नऊवारी साडी टाकते. आपल्या अंगावर कोणी तरी नऊवारी साडी टाकलेली पाहून ही वृद्ध महिला खूप आनंदी होते. त्यानंतर ती व्यक्ती या महिलेच्या पुढे येते तेव्हा वृद्ध महिला त्या व्यक्तीचे हात धरून आभार मानते. त्यानंतर ही महिला त्या व्यक्तीच्या गालावर प्रेमाने एक पापा सुद्धा देते. एकमेकांबरोबर पुढे बोलल्यानंतर ती व्यक्ती त्या महिलेच्या हातात पैसे सुद्धा येते. वृद्ध महिलेच्या चेहर्‍यावरील हास्य पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लिहिलेय, ” एका आनंदी आई इतकं सुंदर या जगात कुणीच नसतं.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
A young man fell down while getting off the running train viral video of train accident
“मरता मरता वाचला भाऊ”, चालत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उतरला अन्…, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Young Guy from Latur Searches for Marriage Partner in Pune biodata paati viral
Video : पुण्यात नोकरी नाही तर पोरगी शोधतोय पठ्ठा! लग्नाचा बायोडाटा घेऊन रस्त्यावर फिरतोय, व्हिडीओ व्हायरल
Viral video of disabled Zomato delivery agent riding a bike to deliver food viral on internet
शेवटी विषय पोटा-पाण्याचा! दोन्ही हात गमावले असूनही स्कूटर चालवत करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून जिद्दीला कराल सलाम

हेही वाचा : Video : पुण्यात नोकरी नाही तर पोरगी शोधतोय पठ्ठा! लग्नाचा बायोडाटा घेऊन रस्त्यावर फिरतोय, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आईच्या चेहऱ्यावर हसू आणणं म्हणजे जग जिंकणं असतं!”

हेही वाचा : “आई मला माफ कर, मी नाही करू शकले”; JEE परीक्षा पास होऊ न शकल्याने तरुणीची आत्महत्या; VIDEO पाहून काळजात होईल धस्स

या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “देवा आई तर कधीच चुकीचे वागत नाही. निस्वार्थ प्रेम करते मग तिला अशी शिक्षा का देतोस. कोणत्याच आईवर अशी वेळ नको येऊ देऊ नको. देवा एवढी तरी सद्बुद्धी दे माणसाला” तर एका युजरने लिहिलेय, “खूप चांगलं काम करताय” अनेक युजर्सनी या व्हिडिओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader