बॉस आणि कर्मचारी हे असे नातं हे दोघांसाठी महत्त्वाचे असते. कर्मचाऱ्याला आपले कौशल्य आणि पात्रता सिद्ध करण्याची संधी बॉस देत असतो. पगाराशिवाय बॉसचा विश्वास संपादन करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे असते. बॉससाठी कर्मचारी देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. कर्मचारी विश्वासू आणि मेहनती असतील तर बॉस आपली कंपनीला यशस्वी करू शकतो. विश्वासू कर्मचाऱ्यांच्या जोरावरच बॉस आपल्या कंपनीचे ध्येय पूर्ण करू शकतो. असे असूनही बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यात अनेकदा तणाव दिसून येतो.बॉस कर्मचाऱ्यांमध्ये कधी पगारासाठी तर कधी सुट्ट्यांसाठी बऱ्याचदा वाद होत असतात. सोशल मीडियावर अनेकदा अशा संवादाचे फोटो समोर आले आहेत. सध्या अशाच एका कंपनीचे सीईओ आणि त्याचा कर्मचारी यांच्यामध्ये सुट्टीबाबत झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोनंतर रजे संबधीत धोरणांबाबत मनोरंजक चर्चेला सुरुवात झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा