Father-daughter video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात, तर काही आपल्याला भावूक करतात. आपल्याला माहीत असते की, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. हेच कष्ट लक्षात घेऊन काही मुलं स्वत:ही खूप मेहनत घेऊन आई-वडिलांचं नाव मोठं करतात. साहजिकच त्यामुळे त्या माता-पित्याला आपलं जीवन धन्य झाल्याचं समाधान मिळतं. सध्या असाच एक भावूक करणारा बाप-लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळजवळ १० वर्षांच्या मेहनतीनंतर ही तरुणी सीए झाली आणि याची पहिली बातमी तिनं वडिलांना दिली. त्या प्रसंगी झालेली त्या दोघांची गळाभेट पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी तरळेल यात शंका नाही. एका चहाविक्रेत्याच्या मुलीचा हा संघर्ष दाखवून देणाऱ्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

“बाबा मी सीए झाले”

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Emotional Video of father went viral on social media shows dads hardwork
एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
Hardworking old women Viral Video
‘गरिबी माणसाला जगणं शिकवते…’ भरपावसात आजींनी असं काही केलं; VIDEO पाहून नेटकरीही झाले भावूक

समोर आलेला हा व्हिडीओ दिल्लीचा असून, तो सीए परीक्षेचा निकाल लागल्यानंतर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिच्या वडिलांना मिठी मारून रडत आहे. बाबा मी सीए झाले, असं सांगत तिनं वडिलांना मिठी मारली आणि मग तिच्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले आहेत. दोघेही बाप-लेक भावनिक झाले आहेत. हा दिवस पाहण्यासाठी इतकी वर्षं दोघांचाही परिस्थितीशी संघर्ष सुरू होता आणि अखेर त्याचं फळ मिळाल्याचं समाधानही दोघांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. चहा विकून आपल्या मुलीला स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी पाठबळ दिल्यामुळे या तरुणीच्या वडिलांचंही खूप कौतुक होत आहे.

१० वर्षांच्या मेहनतीनंतर लेक सीए झाली

अमिता प्रजापती, असं या तरुणीचं नाव असून, ती दिल्लीची रहिवासी आहे. अमिता प्रजापतीने सांगितले की, तिच्या वडिलांनी नातेवाइकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला पूर्ण पाठिंबा दिला. वडिलांच्या पाठिंब्यामुळेच तिचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि त्यामुळेच माझं चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न साकार होण्यास मदत झाली, असं ती सांगते. परीक्षांमध्ये जेवढी मेहनत मुलं घेतात, तेवढीच मेहनत पालकही घेत असतात. परीक्षा जवळ आल्यावर जशी धाकधूक मुलांना असते, तशीच भीती पालकांनाही वाटत असते. पण जेव्हा मुलं ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात तेव्हा आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मुलांना मिळालेल्या यशाचा जर सर्वांत जास्त आनंद पालकांना होत असतो. बाप-लेकीचा आनंद दाखविणारा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता समोर आला आहे. सीएचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येतात; ज्यामुळे त्यांचे कौतुक वाटते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: संभाजीनगरमध्ये उद्योजकाला जिममध्येच मृत्यूनं गाठलं; अचानक कोसळला अन् ५ सेकंदात गेला जीव, पाहा नेमकं काय घडलं?

हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत आणि अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. बापानं कष्ट करावेत आणि पोरांनी त्या कष्टांचं मोल करावं, अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला असून, ते भावूक झाले आहेत. व्हिडीओवर त्यांच्याकडून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, बापाच्या कष्टाचं चीज झालं. तर दुसऱ्या एकानं शेवटी संघर्षाचं फळ मिळालं, अशी कमेंट केलीय.