Father-daughter video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात, तर काही आपल्याला भावूक करतात. आपल्याला माहीत असते की, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. हेच कष्ट लक्षात घेऊन काही मुलं स्वत:ही खूप मेहनत घेऊन आई-वडिलांचं नाव मोठं करतात. साहजिकच त्यामुळे त्या माता-पित्याला आपलं जीवन धन्य झाल्याचं समाधान मिळतं. सध्या असाच एक भावूक करणारा बाप-लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळजवळ १० वर्षांच्या मेहनतीनंतर ही तरुणी सीए झाली आणि याची पहिली बातमी तिनं वडिलांना दिली. त्या प्रसंगी झालेली त्या दोघांची गळाभेट पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी तरळेल यात शंका नाही. एका चहाविक्रेत्याच्या मुलीचा हा संघर्ष दाखवून देणाऱ्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा