चहा म्हणजे अनेकांसाठी अमृतासारखा आहे. भारतात तर चहाप्रेमींची कमी नाही. अनेकांना एक कप चहाने अशी काही एनर्जी मिळते ज्यामुळे ते पुढे कितीही तास उत्साहात काम करु शकतात. काहींच्या दिवसाची सुरुवातचं एक कप चहाने होते. यामुळे नाक्या-नाक्यावर आपल्याला एकतरी चहाची टपरी दिसते. अशाच एका चहाच्या टपरीवरील संतापजनक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यात टपरीवरील चहावाल्याने जे कृत्य केले ते पाहून तु्म्ही टपरीवर चहा पिताना दहावेळा विचार करा, तर काहींची तर चहा पिण्याची इच्छाच होणार नाही.

व्हिडीओमध्ये चहावाल्याने कप धुण्यासाठी एवढं वाईट कृत्य केलं की, जे पाहून कोणालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक चहावाला छोट्या टपरीवर चहा विकत असल्याचे दिसून येत आहे. या चहावाल्याच्या हातात एक कप आहे. या कपात तो आधी लघवी करतो,सुरुवातीला स्पष्ट काही दिसत नाही. नंतर कपात केलेली लघवी फेकताना दिसतो. त्यानंतर गरम केलेला चहा तो त्याच कपात ओततो आणि ग्राहकाला देतो. त्यानंतर पुढे जे दृश्य दिसतं ते पाहून तुम्ही हादरूनच जाल.

चहावाला आपल्या पँटची चैन लावताना दिसतोय, याचा अर्थ त्याने ज्या कपातून पाणी फेकलं ते पाणी नाही तर लघवी होती. त्याने कपात लघवी करून त्याच लघवीने तो कप धुतला आणि त्यातच चहा ओतून ग्राहकाला दिला. चहावाल्याच्या या किळसवाण्या कृत्याचा व्हिडीओ लांबून कोणीतरी एक व्यक्ती शूट करत होता. हे कृत्य पाहून कोणाचाही संताप होईल. पण हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. इंस्टाग्रामवर @gieddeee नावाच्या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.

Story img Loader