सोशल मीडियामुळे सध्या जगातील कुठल्या कोपऱ्यात काय सुरू आहे, याबद्दल सगळी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच कितीतरी उत्तमोत्तम कला असणाऱ्या कलाकारांना या माध्यमातून पाहू शकतो, त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. काही जण तर सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर म्हणून काम करतात, तर काही काम करत असताना एक-एक कलागुण दाखवत लोकांचे मन जिंकतात.
सध्या सोशल मीडियावर अशाच चहा विक्रेत्याचा एक अतिशय भन्नाट व्हिडीओ चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. त्याचे कारण केवळ त्याकडे मिळत असणारा चहा हे नसून, आपल्या ग्राहकांसाठी अतिशय सुरेल आवाजात गायलेले चहावरील गाणे हे आहे. कंटाळा आला, मित्रांसोबत बाहेर असल्यावर किंवा कोणत्याही कारणामुळे आपण अगदी सहज चहा टपरीवर जाऊन एखादा कप मस्त गरमागरम चहा पितो. त्यामुळे आपल्याला आलेला आळस, कंटाळा क्षणात नाहीसा होतो.
हेही वाचा : खाली खोल दरी अन् दोरीच्या मदतीने गड चढतोय चिमुकला! पाहा, अंगावर काटा आणणारा धाडसी Video
मात्र, गोव्यामध्ये चहा मिळेपर्यंत तुमची मस्त करमणूक व्हावी म्हणून भन्नाट शब्द असणारे चहावरील गाणे तेथील विक्रेते गातात, असे व्हिडीओमध्ये दिसते. “गरम गरम मसालेवाली” असे म्हणत गाण्याची सुरुवात झालेली आपण पाहू शकतो. यानंतर त्यामध्ये चहा कसा तयार होतो, त्यामध्ये काय पदार्थ घातले जातात, त्याची चव कशी लागते, याबद्दल गोड शब्दांमध्ये वर्णन केले आहे. “धीमी धीमी आंच पे ना, चाय उबल जाये; लंबी लंबी चुस्कीया जब मेहेफीले जमावाये..” असे गात, विक्रेता सर्वांना चहा पिण्यासाठी बोलावतो.
यानंतर त्यांच्याकडे किती प्रकारचे चहा मिळतात हेदेखील अतिशय सुरात सांगतो. शेवटी, “मिठी मिठी, जैसे बंदी कि बाते…” असे चहाच्या गोडव्याची तुलना प्रेयसीच्या मिठ्ठास बोलण्यासोबत केल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. गोव्यामधील अगुआडा कॅफेमध्ये हे असे सांगीतिक चहापान होते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते पाहा.
“आनंदाने काम करणे याला म्हणतात!” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “वाह! मिठी मिठी, जैसे बंदी कि बाते! खूपच सुंदर..” असे म्हटले आहे. तिसऱ्याने, “चहाचे माहीत नाही, पण ही थीम मस्त आहे” असे म्हटले आहे.
हेही वाचा : बापरे! बिबट्याने हॉटेलमध्ये घातला धुमाकूळ; व्हायरल होणारा चित्तथरारक व्हिडीओ पाहा…
हा व्हिडीओ @itsrajsharmagain या अकाउंटवरून शेअर झाला असून, आतापर्यंत याला ५८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.