काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चेरापुंजीमधील एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन नाना पटोले एका महिलेसोबत चेरापुंजी येथे असल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली होती. नाना पटोलेंनी हा मला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं उत्तर या प्रकरणावर बोलताना दिलं होतं. आता याच प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पहिल प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामधील जनसुनावणीच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना चाकणकर यांना या प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

नक्की वाचा >> नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुर्मू यांचं अभिनंदन करणारी मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; फोटो ठरतोय चर्चेचा विषय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय?
२० जुलै रोजी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी, “नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला. ‘अशा’ पीडितांनी समोर यावं योग्य ती कारवाई होईल,” असं म्हटलं होतं. तसेच पुढे बोलताना, “सकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्ट येत नाही ती खासगी असते. मात्र जेव्हा ती सार्वजनिक जीवनामध्ये येते तेव्हा लोकप्रितिनिधी म्हणून त्यांना विचारलं पाहिजे. त्यानुसार मी विचारलंय ट्वीट करुन त्यांना,” असं चित्रा वाघ म्हणाल्या. त्यांनी “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलातं” या कॅप्शनसहीत हा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या गाण्यासहीत एडीटींग केलेला व्हिडीओ ट्वीट केला होता.

नक्की वाचा >> Devendra Fadnavis Birthday: भाजपा आमदाराने फडणवीसांची प्रभू रामचंद्रांशी केली तुलना; म्हणाले, “मी माझ्या श्रीरामाच्या…”

काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओच्या सुरुवातीला रोमान्स इन चेरापुंजी, मेघालय असं लिहिण्यात आलं असून एक व्यक्ती एका महिलेच्या गळ्यात हात घालून बसल्याचं दिसत आहे. याच फ्रेममध्ये व्हिडीओत “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, काय आ***, नाना एकदम ओके” असा मजकूर लिहिण्यात आलाय. यात खुर्चीवर महिलेच्या खांद्यावर हात ठेऊन बसलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाहीत. त्या महिलेचाही चेहरा दिसत नाहीय. मात्र पुढच्या फ्रेममध्ये त्या व्यक्तीने जे टीशर्ट घातलं आहे त्याच पद्धतीच्या आणि रंगाच्या टीशर्टमध्ये नाना पटोले अगदी पाश्चिमात्य पेरहावामध्ये दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी हे फोटो पोलो ऑर्कीड हॉटेलमधील असल्याचा दावा फोटोंसहीत करण्यात आला.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

याच व्हिडीओच्या आधारे चित्रा वाघ यांनी “व्हिडीओत नाना पटोले महिलेसोबत दिसत आहेत,” असं पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या?
नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल होतोय, असं म्हणत चाकणकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना चाकणकर यांनी, “संबंधित पिडिता राज्य महिला आयोगाकडे तक्रार करतात तेव्हा आम्ही त्याची दखल घेतो. राज्य महिला आयोगाकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाहीय,” असं सांगितलं. पुढे बोलताना, “तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करुन संबंधित पोलिसांना कारवाई करा म्हणून सूचना देतो. राज्य महिला आयोग हे घटनात्मक दर्जाचा विभाग आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आमच्याकडे आलेली तक्रार, त्यासंबंधित पुरावे यासंदर्भात पोलीस विभागाला सूचना देत असतो,” असं आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना चाकणकर म्हणाल्या.

नक्की पाहा >> Photos: एक कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी होणार CM शिंदेंचा सल्लागार? सेवानिवृत्तीनंतर ७ वेळा मिळाली मुदतवाढ

नाना काय म्हणाले होते?
चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोलेंनी, “हे सगळं प्रकरण आमचं मिडीया सेल बघतय मी सध्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. आपल्या देशात राजकारणाची पातळी खाली उतरलेली दिसतेय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल असे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात आमची लीगल टीम कारवाई करत आहे. त्यांच्याबद्दल (चित्रा वाघ यांच्याबद्दल) मला काही बोलायचं नाहीय. खरं काय ते समोर येईल,” असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chairperson of maharashtra state women commission rupali chakankar on nana patole cherrapunji viral video scsg