ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये आता दोन नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन शब्दांमध्ये ‘चना’ आणि ‘चना दाल’ या दोन शब्दांचा समावेश केला गेलाय. दर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर या डिक्शनरीमध्ये अनेक नव्या शब्दांचा समावेश करण्यात येतो. यावेळी यात दोन नवीन शब्दांना स्थान मिळालंय. यापूर्वी ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘यार’,’ चुडीदार’, ‘भेळपुरी’, ‘पापड’, ‘पटेल’ यासारख्या शब्दांचा समावेश करण्यात आला होता.
Video : जपानी शाळेतील मधली सुटी कशी असते माहितीये?
यंदा या डिक्शनरीत किराणा मालाशी संबधित ८० हून अधिक शब्दांची भर घातली आहे. हा शब्द नेमका कुठून आलाय आणि त्याची विस्तृत माहितीही यात देण्यात आलीय. याव्यतिरिक्त ऑक्सफर्ड डिक्शनरीत टेनिससंबंधित काही शब्दांचाही समावेश करण्यात आलाय. यात ‘फोर्स्ड एरर’ आणि ‘बेगल’ या शब्दांना स्थान मिळालंय. शिवाय, ‘वोक’ आणि ‘पोस्ट ट्रूथ’ यांसारख्या शब्दांचाही समावेश करण्यात आलाय. यावेळी ऑक्सफर्डने ६०० हून अधिक नवीन शब्दांचा डिक्शनरीत समावेश केल्याचं समजतंय.
Viral Video : शाळेत मोबाईल आणणाऱ्या मुलांना अशी घडवली जाते अद्दल