Chandrayaan-3: भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे.त्यामुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहे.हा आंनदी क्षण साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी इस्त्रोला सोशल मीडियावर वरून शुभेच्छा दिल्या. अनेकांनी तर सोशल मीडियाद्वारे इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक देखील केलंय. कारण ‘चांद्रयान-२’ च्या अपयशानंतर पुन्हा एकदा केवळ ४ वर्षात आपल्या वैज्ञानिकांनी हे नवं यान तयार करून दाखवलं. पण चांद्रयानाच्या यशानंतर गावागावात विनोदी चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ पाहून लोटपोट हसाल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार मुलं गावात एका ठिकाणी गप्पा मारत बसली आहेत. यावेळी त्यांच्यामध्ये चांद्रयान ३ च्या यशाबद्दल चर्चा सुरु होतात. यावेळी त्यातील एकजण म्हणतो, “माझे चुलते तिथे झाडून काढायला होते.” दुसरा म्हणतो, “माझ्या आत्याने त्याचे चाकं बसवले आहेत.” तर तिसरा म्हणतो, “याच्या मामानी त्याच्यात डिझेल भरलंय.” चौथा तर हद्दच पार करतो. म्हणतो, “आमचे नाना तर यानाला लटकून चंद्रावर गेलेत, कालच त्यांनी फोन केला होता, पोहोचलो म्हणून… ते म्हणाले रस्त्याने जाताना खायची लय आबळ झाली.” अशा प्रकारे गमतीशीर चर्चा या मुलांमध्ये सुरु आहे. या हा संवाद एकून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
हेही वाचा –
हेही वाचा – रस्त्यावर मुलांना शिकवले, पोटासाठी फळे विकली, IAS ऑफिसरने शेअर केला आईच्या संघर्षाचा VIDEO
दरम्यान काही मीम्सच्या माध्यमातूनही चांद्रयान ३ वर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस आला आहे. नेटकरी या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत.