भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले आहे. यामुळे भारत हे मिशन पूर्ण करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. यानंतर विक्रम लँडर चंद्रावर १४ दिवस काम करत पाणी, खनिज, भूकंप, उष्णता, माती याचा अभ्यास करेल. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा हा प्रवास खूप कठीण होता, पण भारतीय वैज्ञानिकांनी हे मिशन यशस्वी केले, ज्यामुळे भारताबरोबरच जगातील अनेक देशांना याचा फायदा होणार आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळले. यासोबतच लोक सोशल मीडियावर फोटो शेअर करून इस्रोचे अभिनंदन करत आहेत. यासह भारतीच्या अभिमानस्पद कामगिरीवर वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल होत आहेत.
चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
तुम्हा सर्व इस्रो टीमचा आम्हाला अभिमान आहे
चाँद पे हें आपुन..
हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही
फक्त या स्मित हास्याची वाट पाहत होतो.
सर्वांसाठी अभिमानाचा क्षण
इस्रो टीमच्या मेहनतीचे फळ
पोहोच गये हमारे लड़के वहां