Chandrayaan 3 Mamata Banerjee Rakesh Roshan Video: चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगच्या यशाचे दणक्यात सेलिब्रेशन भारतात सुरु आहे. पण असं असतानाच काही अनभिज्ञ मंडळींच्या चांद्रयानावरील कमेंट्समुळे नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत तर त्यांचं ज्ञान बघून अनेकांना धक्का बसत आहे. चांद्रयान लँड होताच राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांनी कालच यानातून चंद्रावर गेलेल्या प्रवाशांचं कौतुक केलं होतं. हाच प्रकार काय कमी होता की काय म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषणात भलतीच मजेशीर चूक केली आहे. ममता दीदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ तुफान वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ISRO ने चांद्रयान 3 सह विक्रम रचल्यावर ममता दीदी यांनी ISRO च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारताने चंद्रावर माणूस पाठवल्याच्या पराक्रमाची सुद्धा ममता बॅनर्जींनी आठवण काढली. इंदिरा गांधी यांनी चंद्रावर गेलेल्या राकेश शर्माला जेव्हा वरून भारत कसा दिसतो हे विचारलं होतं तेव्हा त्याने सारे जहाँ से अच्छा असं उत्तर दिलं होतं. हा क्षण भारतीयांसाठी अजरामर आहे. पण याच क्षणाच्या आठवणींना उजाळा देताना ममता बॅनर्जी यांनी राकेश शर्मा ऐवजी चक्क प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना भारतीय अंतराळवीर म्हणून संबोधले आहे.
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींनी तर ममता यांच्या बोलण्यानंतर आता राकेश रोशन यांना अंतराळवीरांच्या वेशात दाखवणारे मीम सुद्धा शेअर करायला सुरुवात केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी राकेश रोशन यांना चंद्रावर धाडल्याने नेटकरी म्हणतात…
हे ही वाचा<< चांद्रयान ३ लँडिंगनंतर ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांचा जबरदस्त डान्स मिस करू नका! गाणं ऐकून नेटकरी चकित
ममता बॅनर्जी यांच्या व्हिडिओवर काहींनी टीका करत आपल्याकडे पंतप्रधान होण्यासाठी अजून एक पात्र उमेदवार तयार आहे असेही म्हटले आहे. कदाचित बोलण्याच्या ओघात ममता बॅनर्जी यांना नावात गल्लत झाल्याचे लक्षातही आले नसावे पण त्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त करायला हवी होती असेही काहींनी म्हटले आहे.