अंकिता देशकर

Chandrayaan 3 Rocket Video: भारताने पाठवलेलं चांद्रयान ३ ही इस्रोसाठी यंदाच्या वर्षातील अत्यंत यशस्वी मोहीम ठरली. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले. याच संपूर्ण प्रक्रियेतील काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले. लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जाणाऱ्या अनेक व्हिडिओ क्लिप या चुकीच्या पद्धतीने शेअर होत असल्याचे लक्षात आले पण त्यातील एक व्हिडीओ हा अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे.

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजेने शेअर केला लीलाबरोबरचा व्हिडीओ; चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, “परफेक्ट जोडी”
Viral video Teen driver strikes boy in grandfather arm drags him metres away
नातवाला कडेवर घेऊन जात होते आजोबा, तेवढ्यात भरधाव वेगाने कार आली अन् लेकराला…… Viral Video पाहून अंगावर येईल काटा
woman risked her life to make a reel on train track shocking video goes viral
तरुणी रेल्वे रुळावर रील बनवण्यात मग्न, ट्रेन आल्याचंही भान राहिलं नाही अन्…; VIDEO चा शेवट पाहून तुम्हालाही येईल संताप

या व्हिडिओ क्लिपमध्ये एका ट्रकवर रॉकेट वाहून नेताना दिसत आहे. चांद्रयान 3 हे प्रक्षेपणापूर्वी जेव्हा रॉकेट श्रीहरीकोटा येथे पाठवले जात होते तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे समजतेय. भलेमोठे रॉकेट घेऊन ट्रक नदी ओलांडताना दिसत होता. एवढं जोखमीचं काम हाती घेतल्याबद्दल लोक पोस्टवर ट्रकच्या ड्रायव्हरचं कौतुक करत होते. पण नेमकं हे प्रकरण काय?

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Sam.iE ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओ डाउनलोड करून आणि InVid टूलमध्ये अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. आम्हाला अनेक स्क्रीनशॉट मिळाले आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला एक व्हिडिओ Fajar Sukmaludin या पेज वर सापडला.

हा व्हिडिओ 7.03 मिनिटांचा होता. 3 मिनिटांच्या सुमारास व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असेच दृश्य दिसले. व्हिडिओ MudRunner प्लेलिस्टवर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये असेही नमूद केले आहे की वापरकर्ता Spintires: MudRunner खेळत आहे. आम्ही हा व्हिडिओ YouTube वर देखील शोधला.

आणि याच क्रिएटरचे YouTube चॅनेल सुद्धा आढळले. ‘About’ विभागात निर्मात्याने तो ‘गेमिंग व्हिडिओ क्रिएटर’ असल्याचे नमूद केले होते.

बऱ्याच व्हिडिओ वर, ‘Mudrunner l Logitech G29 Gameplay’ असे कॅप्शन मध्ये लिहले होते. म्हणून आम्ही ‘Mudrunner l Logitech G29 Gameplay’ असा किवर्ड सर्च गूगल वर केला. अशा प्रकारे आम्हाला कॅप्शनसह एक रील सापडला, ‘Aborted Rocket Launch | Game MudRunner’.

त्यानंतर आम्ही, ‘Aborted Rocket Launch | Game MudRunner’ असा तपास गूगल सर्च वर केला. याद्वारे आम्हाला असेच विविध व्हिडिओ सापडले.

प्राप्त माहितीनुसार, हा ओपन वर्ल्ड ट्रक ड्रायव्हिंग सिम्युलेशन गेम आहे.

https://spintires-mudrunner.en.softonic.com/

निष्कर्ष: चांद्रयान 3 चे रॉकेट वाहून नेत असल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ, प्रत्यक्षात Spintires: MudRunner या गेममधील व्हिडिओ गेम क्लिप आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.

Story img Loader