भारताची महत्वकांक्षी चांद्रयान ३ मोहिम काल बुधवारी यशस्वी झाली आणि संपूर्ण जगाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचं चांद्रयान उतरताना पाहिलं. यानंतर जगभरातून इस्रोवर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे. कारण दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवून भारताने इतिहास रचला आहे. लँडरला या भागात सॉफ्ट लँडिंग करावे लागले, जे खूप चांगल्या पद्धतीने झाले. चांद्रयान ३ च्या मोहिमेच्या यशासाठी देशभरात प्रार्थना सुरू होत्या. जगभरातील शास्त्रज्ञ आणि सर्वसामान्यांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या.

भारताने हा इतिहास रचून अवघ्या जगाला थक्क केले आहे. अंतराळ संस्था इस्रोच्या कष्टाचे सर्वजण कौतुक करत आहेत. अशातच आपला शेजारी देश पाकिस्तानमधील काही नागरिकांनादेखील भारताचे अभिनंदन करण्याचा मोह आवरता आला नाहीये. हो कारण सध्या सोशल मीडियावर Congratulations Neighbors (अभिनंदन शेजारी) हा ट्रेंड सुरु आहे. पाकिस्तानचे भारताशी कितीही वैर असले, तरी या यशानंतर पाकिस्तानी लोकही भारताचे अभिनंदन करताना दिसत आहेत. शिवाय यावेळी अनेक पाकिस्तानी वेगवेगळे फोटो शेअर करत, ‘आज पाकिस्तान कुठे आहे आणि भारत कुठे पोहोचला आहे,’ हे दाखविण्याचाही प्रयत्न करत आहेत.

Hindenburg Research winds down
Hindenburg Research : अदाणी समूहाबाबत अहवाल देऊन खळबळ माजवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चला कुलूप, संस्थापकांनी लिहिली भावूक पोस्ट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
PM Modi-Omar Abdullah
PM Modi-Omar Abdullah : PM मोदी आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यातील मैत्री वाढली? झेड-मोढ बोगद्याच्या उद्घाटनावेळी नेमकं काय घडलं?
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक

हेही पाहा- VIDEO: “चांद्रयान ३ मधून चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना मी…”; या वक्तव्यामुळे काँग्रेस नेता ट्रोल

काय म्हतायत पाकिस्तानी?

उसबाह मुनेम नावाच्या वापरकर्त्याने लिहिलं, “अभिनंदन शेजारी, तुम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत आहात यात शंका नाही.” तर यासिर खान नावाच्या युजरने लिहिलं आहे, “अल्लाह कोणत्याही समुदायाची स्थिती तोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत तो स्वत: बदलत नाही. अभिनंदन शेजारी. मोठी कामगिरी.”

हसीब अहमदने लिहिलं ‘पाकिस्तानी आपले मतभेद विसरले आहेत. Congratulations Neighbours सोबतच Congratulations भारत देखील पाकिस्तानमध्ये ट्रेंड करत आहे. भारताने या दाखवून दिले आहे की, खूप अडचणी असूनही जर तुमच्याकडे खरे लोक असतील तर काहीही अशक्य नाही.

तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं की, एक पाकिस्तानी म्हणून माझा विश्वास आहे की भारत आर्थिकदृष्ट्या आपल्यापेक्षा खूप पुढे आहे आणि आज भारताचे कौतुक केले पाहिजे. भारताचे अभिनंदन. अभिनंदन शेजारी पाकिस्तानकडून खूप प्रेम.

चांद्रयान मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरणारा जगातील पहिला देश बनला आहे. तसेच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा हा जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी रशिया, चीन आणि अमेरिकेने हे स्थान मिळवले होते. पण त्याचे कार्य विषुववृत्त प्रदेशापुरते मर्यादित होते. तर भारताच्या विक्रम लँडरने दक्षिण ध्रुवीय क्षेत्राजवळ सॉफ्ट लँडिंग केले आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

Story img Loader