Chandrayaan 3 Updates: आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण चांद्रयान ३ आज सांयकाळी सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष भारताकडे असणार आहे. शिवाय या मिशनमुळे देशभरातील जनतेमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश सरकारने तर शाळांमध्ये चांद्रयान ३ मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखवण्याचा आदेश जारी केला आहे. या मिशनच्या यशस्वी लँडिंगसाठी देशात अनेक ठिकाणी पूजा आणि हवनही केले जात आहेत. तर सोशल मीडियावरही लोक मिशनच्या यशासाठी अनोख्या अंदाजाच प्रार्थना करत आहेत. तर आज ट्विटरवर #Chandrayaan3Landing असा ट्रेंडदेखील सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंदिरात प्रार्थना आणि मशिदीत नमाज-

चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वितेसाठी मंदिरात प्रार्थना करण्यात येत असून, मशिदीतही नमाज अदा केली करण्यात येत आहे. चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगसाठी साधूंनी वाराणसीमध्ये होमहवन केले, तर राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा येथे प्रार्थना करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही लोक या मिशनच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. त्याच वेळी, काही लोक आहेत जे या मिशनबद्दल मजेदार कमेंट करत आहेत.

हेही पाहा- पोलिसांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ड्रायव्हरने रस्त्यावरील लोकांना चिरडलं, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

अभिनेते अनुपम खेर यांनी केली पूजा –

अभिनेते अनुपम खेर यांनीही एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मिशनच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. “चांद्रयान ३ साठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे आणि देशाची प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल,” असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

प्रवीण नावाच्या युजरने लिहिलं आहे की, “लहानपणापासून ज्याला आपण चंदामामा म्हणत होतो, त्याचा अभिमान वाटतो, आज काही तासांमध्ये आपण तिथे असणार आहोत.” तर @bijjuu11 ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, “भारताने एशिया कप गमावला तरी चालेल पण प्रभू चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वी लँडिंग होऊदे.”

भारताची चांद्रयान ३ मोहीम २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्रोनुसार, चांद्रयान ३ आज २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणार आहे. इस्रोच्या ताज्या निवेदनात असे म्हटले आहे की मिशन ठरलेल्या वेळेनुसार काम करत आहे. त्याची नियमित तपासणी सुरू असून सर्वकाही सुरळीत सुरू आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 updates funny wishes from netizens for the successful landing of chandrayaan 3 viral memes will make it hard not to smile jap