अंकिता देशकर

Chandrayaan 3 Video Surface: भारताच्या महत्वकांक्षी चंद्रयान मोहिमेचा आज शेवटचा टप्पा आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला सुद्धा एक मोठ्या प्रमाणात शेअर केलेली व्हिडिओ क्लिप आढळली, ज्यात असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ भारताच्या अलीकडील चंद्र मोहिमेचा आहे, सदर व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य हे चंद्रयान 3 द्वारे शेअर केलेले आहे. या अत्यंत मोहक व्हिडिओमध्ये अवकाशातून पृथ्वीचे उजळलेले रूप पाहायला मिळत आहे. साहजिकच व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत पण नीट लक्ष दिल्यावर तुम्हाला सुद्धा या व्हिडिओची खरी बाजू लक्षात येईल. नेमका हा प्रकार काय आहे चला पाहूया…

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Jalebi Baby ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

संपूर्ण व्हिडिओ पाहून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला व्हिडिओ च्या शेवटी काही क्रेडिट्स दिसले. क्रेडिट्स मध्ये इंग्रजीत लिहले होते: Som ET – Credit: University of Iowa, Image courtesy of the Earth Science and Remote Sensing Unit, NASA Johnson Space Center (ISS067 – E – 357091 – 357756)

त्यानंतर आम्ही वरील क्रेडिट्स वापरून गूगल कीवर्ड द्वारे शोध घेतला आणि आम्हाला Som ET च्या Instagram पेजवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.

कॅप्शन मध्ये लिहले होते: Som ET – 83 – Earth – ISS 067-E-357091-357756

Audio: Som ET – 83 – Earth

Audio recordings of NASA’s Van Allen Probes/Waves plasma wave observations.

NASA Images: https://eol.jsc.nasa.gov/SearchPhotos/mrf.pl?scope=both&MRFList=ISS067-E-357091-357756

Credit: University of Iowa, Image courtesy of the Earth Science and Remote Sensing Unit,
NASA Johnson Space Center (ISS067-E-357091-357756) eol.jsc.nasa.gov

आम्हाला हा विडिओ फेसबुक वर देखील सापडला.

आम्ही संदर्भ क्रमांक देखील शोधला आणि मूळ फोटो सापडला.

https://eol.jsc.nasa.gov/SearchPhotos/photo.pl?mission=ISS067&roll=E&frame=357534

आम्ही स्क्रीन ग्रॅब्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला आणि यामुळे आम्हाला ESA, युरोपियन स्पेस एजन्सीच्या वेबसाइटवर लिंक मिळाली.

https://www.esa.int/ESA_Multimedia/Videos/2022/10/Moonlight_Timelapse/%28lang%29/en

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे म्हटले आहे: ESA अंतराळवीर सामंथा क्रिस्टोफोरेटीच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील दुसऱ्या मोहिमेदरम्यान, “मिनर्व्हा” मधील टाइमलॅप्स व्हिडिओ. सामंथाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

आम्हाला अंतराळवीर, सामंथा क्रिस्टोफोरेटीच्या ट्विटर प्रोफाइलवर व्हिडिओ देखील सापडला.

हे ही वाचा<< Video: चंद्रयान ३ लँडिंगची वेळ जवळ आली! पुणेकरांनी केला होम व महाआरती तर देशभरात नमाज पठण सुरु

निष्कर्ष: ESA अंतराळवीर सामंथा क्रिस्टोफोरेटीने बनवलेला टाईमलॅप्स व्हिडिओ चांद्रयान 3 ने काढलेला व्हिडिओ असल्याचे सांगून व्हायरल होत आहे. व्हायरल दावा खोटा आहे.