अंकिता देशकर

Chandrayan 3 Viral Video: भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या दिशेने झेपावले. १४ जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी चंद्रायानाचे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या यानातील लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणे अपेक्षित आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सोशल मीडियावर याचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले होते. विमानातून प्रक्षेपणाचा क्षण टिपल्याचा एक व्हिडीओ तुम्हीही पाहिला असेल पण आता या व्हिडीओचे सत्य समोर येत आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत

व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स आणि सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा दावा केला जात होता की हा दुर्मिळ व्हिडिओ चेन्नईहून ढाका जात असलेल्या फ्लाइटमध्ये कॅप्चर करण्यात आला होता.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Glorious Punjabis Globally ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

लाइटहाऊस जर्नलिझमला हा व्हायरल व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असल्याचे आढळले. आम्ही व्हिडिओ डाउनलोड केला आणि तो InVid टूलमध्ये अपलोड केला. याद्वारे आम्हाला विविध स्क्रीनग्रॅब मिळाले. आम्ही प्रत्येक कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चालवला. आम्हाला व्हायरल व्हिडिओ futurism.com वरील लेखात सापडला

https://futurism.com/the-byte/jet-launchpad-spacex-rocket-takes-off

लेखाचे शीर्षक होते: Passenger jet flies over launchpad right as SpaceX rocket takes off

नोव्हेंबर २०२२ मध्ये अपलोड केलेल्या लेखात म्हटले आहे: फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हरलवरून उड्डाण करणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या व्यावसायिक जेटमधील प्रवाशांना दुर्मिळ दृश्य पाहता आले. याठिकाणी SpaceX चे Falcon 9 रॉकेट NASA च्या केनेडी स्पेस सेंटरवरून खाली उतरत आहे.आम्हाला आढळले की हा व्हिडिओ निक लीम्बाचने २७ नोव्हेंबर २०२२ रोजी शूट केला होता.

आम्हाला हा व्हिडिओ Health & Technology या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेला मिळाला.

आम्हाला या व्हिडीओ संदर्भात बऱ्याच बातम्या देखील सापडल्या.

https://headtopics.com/us/passenger-jet-flies-over-launchpad-right-as-spacex-rocket-takes-off-32222573
Watch Incredible Footage Taken By A Passenger Jet Flying Over A Launchpad Right As SpaceX Rocket Takes Off

हे ही वाचा<< काश्मीरमध्ये भररस्त्यात दहशतवाद्याला नाट्यमय अटक? कामगिरी कौतुकाची, पण ‘या’ चुकीमुळे ट्रोलिंग सुरु

निष्कर्ष: आकाशातून कॅप्चर केलेल्या चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा दावा केलेला व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात नोव्हेंबर 2022 चा SpaceX लाँचचा व्हिडिओ आहे.

Story img Loader