चंद्रपूर येथील घुग्घुस अमराई वॉर्डमध्ये २६ ऑगस्ट, २०२२ रोजी एक अचंबित करणारी घटना घडली. येथील एक घर अचानक १०० फूट खोल खड्यात पडलं. अचानक नक्की काय झालं हे गावाकऱ्यांना कळायच्या आत हे घर १०० फूट खोल जमिनीखाली पडले. ज्यामुळे संपुर्ण गावात खळबळ उडाली आणि सगळे गावकरी हे खड्यात पडलेलं घर बघायला जमा झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडली त्या दिवशी गावकरी एक सण साजरा करत होते. त्याचवेळी गजानन मडावी या व्यक्तीचे घर अचानक हलू लागले. त्यामुळे घरातील सर्व सदस्य धावत घराबाहेर आले. सुरूवातीला जमिनीत भूस्खलन झाल्याने घर जमिनीच्या थोडे आत गेल्याचे तिथल्या व्यक्तींना जाणवले. पण बघता बघता तिथे मोठा खड्डा तयार झाला आणि घर त्यात १०० फूट खाली पडले.

आणखी वाचा – कापलेल्या झाडाने उगवला सूड; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा भन्नाट व्हिडीओ पाहाच

तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. भूस्खलन झाल्याचे स्पष्ट होताच परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. अधिक माहिती मिळवण्यासाठी डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील परिसराचा नकाशा तपासला. अनेक दशकांपूर्वी घुग्घुस कॉम्प्लेक्समध्ये रॉबर्टसन इनलाइन खाण होती अशी माहिती समोर आली आहे. नकोडा ते घुग्घुस, नायगावपर्यंत ३ खाणी होत्या. नकोडाची तिसऱ्या क्रमांकाची खाण १९९५ साली बंद करण्यात आली. या खाणीची व्याप्ती नकोडा ते घुग्घुसमार्गे नायगावपर्यंत विस्तारलेली होती. त्यावरच हे गाव वसले आहे. अशा परिस्थितीत ही घटना त्या खाणीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय वणी वेकोली परिसरात कोळसा उत्खननासाठी ब्लास्टिंगचा वापर केला जातो, ज्यामुळे तिथल्या घरांना तडे पडतात. काही घरं यामुळे जमीनदोस्त देखील झाली आहेत. भुयारी खोदकामामुळे जमीन आतल्या बाजूने खचली आहे. अशात वर्धा नदीला लागून असलेला संपूर्ण नकोडा, घुग्घुस व नायगावचा काही भाग आतून कोसळला होता. ज्यामुळे शेकडो लोकांचा जीव धोक्यात आला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrpur house got buried in a 100 feet deep pit due to landslide pns
Show comments