विठ्ठल रखुमाई हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. लाखो भक्त दरवर्षी पायी पंढरपूरला जातात आणि टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरतात आणि अभंग आणि भजन गात पायी पंढरपूरला जातात. आपल्यापैकी अनेकांनी संत ज्ञानोबा, संत तुकोबा, सत चोखामेळा, संत नामदेव, संत एकनाथ अशा अनेक संताचे अंभग ऐकले असतील. अंभागाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम अनेक संतानी केली तर अनेकांनी विठोबासाठी भक्तीमय प्रेम व्यक्त करणारे अनेक अंभग गायले. आता काळानुसार अंभग, भजन आणि किर्तन हळू हळू मागे पडत चालले आहे, या गाण्यांमधून कोणतेही प्रबोधन होत नाही कारण नव्या पिढी भुलवणारी अनेक नवीन गाणी निर्माण होत आहे जे मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध असतात. नव्या पिढीला आता रॅप साँग आवडतात. त्यामुळे नव्या पिढीच्या तरुणाईची आवड जपत संताचे अंभग त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आता नवीन पर्याय एका तरुणाने शोधला आहे. संताचे अंभग आणि हरिनामाचे रॅप गीत गाऊन काही तरुणांनी नव्या पिढीचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तरुणांनी गायला हरिनामाचा रॅप
हातात टाळ-मृदुंग घेऊन विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण डोक्यावर वारकरी टोपी, अंगात पांढरी कुर्ती, गळ्यात पांढरा पंचा, धोतर नेसून आणि हातात गिटार घेऊन रॅप साँग गाताना कधी कोणाला पाहिले आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण वारकऱ्यांच्या वेशभुषेत हातात गिटार घेऊन अंभग आणि रॅप गाताना दिसत आहे. सुरुवातीला एक तरुण आपल्या मोहक आवाजात संत चोखामेळा यांचा “ऊस डोंगापरी परी रस नव्हे डोंगा”गाताना दिसतात. त्यानंतर दुसरा तरुण रॅप गाताना दिसतो. आपल्या भन्नाट रॅप द्वारे तरुणाने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
तरुणाचा मराठी रॅप ऐका
“आळवावरच्या पाण्याला भुलून गेली दुनिया,
खऱ्याला खोटं पण बोलून गेली दुनिया,
‘दिसतं तसं नस’ हे विसरले लोक
चमचमत्या गोष्टीला भारून गेली दुनिया,
लोकांना दाखवायला इमारत बांधली, पण माणसाने माणुसकी वेशीवर टांगली
हौसेने आणली ती चारचाकी घरी,
पण आई-बाप रस्त्यावरी ही गोष्ट ना बरी,
उजडलं तो दिवस येईल यमाची स्वारी,
पाप-पुण्याचा हिशोब होईल देवाच्या दारी
थोडं तत्वानं जग, थोड नीतिने वाग, हरि नाम जप, भर पुण्याचं माप
झिजलं हा देह, झिजलं ती काया,
अरे मृगजळा गतं सार जाई रे वाया
झिजलं हा देह, झिजलं ती काया,
अरे मृगजळा गतं सार जाई रे वाया”
नेटकऱ्यांनी केलं कौतूक
आजच्या काळातील लोक कशाप्रकारे वागत आहे यावर प्रकाश टाकत हरिनाम जप करण्यास प्रोत्साहन देणारा हा रॅप नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हायरल व्हिडिओ rapboss8055 नावाच्या इंस्टाग्राम अकांऊटवर पोस्ट केला आहे. उस डोंगापरी हे गाणे नितीन कुटे यांनी गायले आहे तर या गाण्यातील रॅप म्युझिक हे rapboss याने गायले आहे. तर अमोल दाते आणि नितीन कुटे यांनी संगीत बद्ध केले आहेत. रॅप साँग apboss यानेच लिहिलेले आहेत.
व्हिडिओ वर कमेंट करून अनेकांनी या तरुणांचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले, “भाऊ एकदम कडक”
दुसऱ्याने लिहिले की, “मस्त भारी एक नंबर”
कोणी सुपर असे लिहिले तर “कोणी अप्रतिम” तर “कोणी खूप छान”