Chaos in Agra as chicken lorry accident : आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर काही वाहनांचा मोठा अपघात झाला. धुक्यामुळे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या लॉरीचाही या अपघातत समावेश होता. अपघातानांतर जे घडले ते दृश्य अविश्वसनीय होते. अपघातस्थळी स्थानिक लोकांनी गाडीतील कोंबड्या पोत्यात भरून नेल्या. कोंबड्या चोरण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहने हटवून रस्ता मोकळा केला.

बुधवारी पहाटे आग्रा-फिरोजाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला. ही घटना दाट धुक्याच्या दरम्यान घडली. झरना-नाला उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये जवळपास १६ वाहनांचा समावेश होता. दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नसल्यामुळे अपघात घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताची बातमी पसरताच, रस्त्यावर पसरलेल्या कोंबड्या लुटण्याची लोकांचा गोंधळ सुरू झाला. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने संधी मिळताच गाडीत ठेवलेल्या पिंजऱ्यातून कोंबडी बाहेर काढली आणि आपल्या पोत्यात भरल्या.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Accident News :
Accident News : कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Parrot talking in english fight with women funny video viral on social media
VIDEO: पोपटाची हुशारी पाहिली का? मालकिणीला सर्दी झाल्यानंतर लावतोय लाडीगोडी; अ‍ॅक्टींग पाहून पोट धरुन हसाल
Leopard lost in front of dog
‘श्वानापुढे बिबट्या हरला…’ क्रूर हल्ला करूनही बिबट्याबरोबर असं काही घडलं.. पाहा घटनेचा थरारक VIDEO

सुमारे १६वाहनांची धडक झाली
धुक्यात शाहदरा जकात नाक्यावर कोंबड्यांनी भरलेल्या वाहनाने १६ वाहनांना धडक दिली. त्यात सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या कोंबड्या भरल्या होत्या. अपघातानंतर काही तासांनंतर आसपास राहणारे ग्रामस्थ आणि काही ये-जा करणाऱ्यांनी कोंबड्यांना वाहनाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढले. काही वेळातच वाहनातील पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडी लुटण्याचा प्रकार सुरू झाला. कोंबड्या लुटण्याचा हा प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होता. पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे पाहून लोकांनी तेथून पळ काढला. तोपर्यंत लोकांनी डझनभर कोंबड्या लुटून नेल्या होत्या.

हेही वाचा – आजीला भेटायला निघाला होता ६ वर्षाचा मुलगा; एअरलाइन्सच्या चूकीमुळे पोहचला भलत्याच ठिकाणी, तेही १६० मैल दूर

लोकांनी कोंबड्या पळवून नेल्या
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अपघाती ट्रकमधून कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिक लोकांची झुंबड उडाल्यानें गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोणी दोन्ही हातात हातात कोंबड्या घेऊन धावत होते. कोणी कोंबड्या पोत्यात भरल्या आणि तेथून निघून गेले. कोंबडीच्या सार्वजनिक चोरीचा हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर तुफान व्हायरल झाला. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – सारखं काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होतेय? डॉक्टरांकडून जाणून घ्या उपाय

एकाने उपाहात्मक शैलीत सांगितले की, ““लोक खूप उपयुक्त आणि दयाळू आहेत. ते पिंजऱ्यात अडकलेल्या आणि जखमी कोंबड्यांना पळून जाण्यास मदत करत आहेत आणि त्यांचा जीव वाचवत आहेत.” दुसरा म्हणाला, “निराश करण्याची एकही संधी उत्तर प्रदेश सोडत नाही.”

Story img Loader