Snake in mumbai local: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अनेक नवनवीन किस्से हे रोजच्या प्रवासादरम्यान घडत असतात. पाऊस तर कधी तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ही विस्कळीत होत असेत. एरवी महिलांच्या डब्यात कुणी इतर चढलं तर महिला आरडाओरडा करतात, मात्र यावेळी महिलांच्या डब्यात दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क साप शिरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकलमध्ये सारेकाही आलबेल असताना अचानक एका डब्यात ‘साऽऽप, साऽऽप’ची आरोळी उठली आणि प्रवाशांच्या गप्पा थांबल्या, भांडणांना ब्रेक लागला, धक्काबुक्कीही शांत झाली! नंतर एकच धावपळ उडाली ती सापाने वेटोळे घातलेल्या जागेपासून दूर सरकण्याची! एरवी गर्दीच्या वेळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या लोकलमध्ये मुंगी शिरण्यास जागा नसते असे विनोदाने म्हटले जात असतानाच, आपल्या डब्यात चक्क सापाने जागा पटकवल्याचे महिला प्रवाशांच्या लक्षात आले आणि पुढील प्रवास त्यांनी जीव मुठीत धरूनच केला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यानंतर स्टेशनवरील पोलीस गार्डला बोलावण्यात आलं असून त्यानं महिलांच्या डब्यात जाऊन तपासलं असता कोणताही साप लोकलमध्ये सापडला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Jawan: ‘जवान’चा बॉक्स ऑफिसवर डंका! शाहरुख खानचा फोटो वापरून यूपी पोलिसांनी फॅन्सला दिला हटके मेसेज

‘लोकलमध्ये साप शिरण्याचा हा पहिलाच प्रकार पाहिला. हा अनुभव अविस्मरणीय होता मुंबईकरांना आता लोकलमध्ये सापांपासूनही वाचावे लागणार आहे, अशा प्रतिक्रिया येत आहेत. @aamchi_mumbai या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaos in mumbai local train after passengers spot snake in ladies compartment local disrupted after video viral srk
Show comments