एखाद्याला फोन करून किंवा कुणाला तरी मेसेजद्वारे लिंक पाठवली जाते. मग अशा फसव्या लिंक डाउनलोड केल्यामुळे अनेक जण ऑनलाइन स्कॅमची शिकार झाले आहेत. तुम्ही या संदर्भातील अनेक बातम्या पाहिल्या असतील. तुमच्या जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून त्यांना आलेले अनुभवही ऐकले असतील. मात्र, हे स्कॅमर्स तुमची सर्व माहिती मिळवितात तरी कशी, असा प्रश्न सर्वसाधारणपणे सर्वांनाच पडलेला असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे त्या क्षेत्रातील अनुभवी वा जाणकार माणसांकडून मिळाले, तर ते जास्त विश्वासार्ह आणि अचूक ठरू शकते. तसेच एखाद्या व्यक्तीबरोबर स्कॅम कसे होते किंवा एखाद्याला स्कॅमच्या जाळ्यात कसे अडकवले जाते याबद्दलची माहितीदेखील खुद्द स्कॅमरकडूनच मिळाली तर… याच संदर्भात माहिती देणारे काही व्हॉट्सअप चॅट्स सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : बापरे! हिरव्या रंगाचे ढग आले दाटून! पाहा, दुबईतील वादळाचा धडकी भरवणारा Video…

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या समाजमाध्यमावरून Chetty Arun नावाच्या अकाउंटवरून एका व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये त्याने स्कॅमरबरोबर मारलेल्या गप्पा आणि लोकांची कशी फसवणूक केली जाते या संदर्भातील मेसेजेस आपण पाहू शकतो. त्यामध्ये स्कॅमरने नेमकी काय माहिती दिली आहे ते पाहू.

सर्वप्रथम एका अनोळख्या व्यक्तीच्या नंबरवरून अरुणला एक APK डाऊनलोड करण्यासाठी मेसेज येतो. त्या मेसेजवर “हे APK अॅण्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आहे. मी आयफोन वापरतो. त्यामुळे तू दुसरीकडे जाऊन इतर अॅण्ड्रॉइड वापरकर्त्यांना टोप्या लाव”, असा मेसेज अरुण स्कॅम नंबरला पाठवतो. मात्र याच प्रकारचे अजून तीन-चार मेसेज आधीच येऊन गेल्यामुळे अरुणने त्या व्यक्तीशी फोन करून बोलायचे ठरवले; मात्र त्याने फोन उचलला नाही

शेवटी अरुणने त्याच्याशी सहज गप्पा मारायला सुरुवात केली. त्यामध्ये त्याने स्कॅम करणाऱ्या व्यक्तीला त्याचे आयुष्य कसे सुरू आहे? काय चालू आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारले. ती अनोळखी नंबरवरील व्यक्तीही त्याच्या प्रश्नांना उत्तरे देते. मग ती अनोळखी व्यक्तीदेखील अरुणला तो काय करतो वगैरे विचारते. तसे अरुणसुद्धा त्याला कॉर्पोरेट ऑफिसमध्ये खूप कंटाळवाणं काम करावे लागतं, असे सांगतो.

पुढे अरुण कुतूहलाने, “हे APK अॅप डाउनलोड केल्यावर काय होते”, असा प्रश्न विचारल्यावर “तुमचे सगळे मेसेज मला दिसतात”, अशी माहिती स्कॅमरने दिली. पुढे स्कॅमरने “डीपीमध्ये दिसणारी व्यक्ती तुम्हीच आहात का”, असे अरुणला विचारले. अर्थात, या प्रश्नाला उत्तर न देता अरुणने पुढे स्कॅमरला विचारलं, “अच्छा म्हणजे जे OTP येणार ते सगळे तुम्हाला दिसणार ना?, पण, मग त्यावरून तुम्हाला आमचे [क्रेडिट/डेबिट] कार्ड नंबर वगैरे कसे मिळतात?”

हेही वाचा : एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित

त्यावर, “तुम्ही ऑनलाइन जे काही वापरता, ते सगळं मी लॉग इन करून बघतो. त्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग साइटवर तुम्ही तुमचे कार्ड नंबर आणि इतर गोष्टी सेव्ह करून ठेवता. तिथूनच आम्हाला तुमची सर्व माहिती मिळते”, असे त्याने सांगितले. इतकेच नव्हे, तर त्या स्कॅमरने, “अशी लिंक चुकून जरी डाउनलोड केली असेल, तर लगेच फोन रिस्टार्ट करा किंवा सिम कार्ड काढून ठेवा”, असा स्कॅमपासून वाचण्याचा सल्लादेखील दिला.

सर्व गोष्टींची माहिती घेऊन झाल्यावर स्कॅमरने अरुणला, “मित्रा, तू अशा कोणत्याही चुकीच्या लिंक्स डाउनलोड करू नकोस”, असा सल्ला दिला. तसेच त्याच्याबरोबर संपर्कात राहण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरच्या अकाउंटचे नावदेखील मागितले. अर्थातच अरुणने ते दिले नाही. मात्र, शेवटी स्कॅमरने अरुणला “तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं भावा. पुढच्या आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा”, असा संदेशदेखील दिला.

समाजमाध्यमांवर अनेक चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचाच हा एक भन्नाट असा नमुना आहे, असे आपण म्हणू शकतो. या व्हायरल पोस्ट आणि फोटोला आतापर्यंत हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chat with scammer went viral on social media scamming person gives tips to avoid online fraud dha
Show comments