सध्या जगभरात chatgpt या चॅटबॉटची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय प्रत्येकजण या चॅटबॉटला टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. हा चॅटबॉट नोकरी करणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका असल्याचंही अनेकजण म्हणत आहेत. AI Chatbot अनेक लोकांच्या नोकऱ्या घालवणार असं म्हटलं जात असतानाच, याच chatgpt चा वापर करुन एक व्यक्ती २४ तासांमध्ये लखपती बनला आहे. हो कारण त्याने चॅटबॉटला काही प्रश्न विचारले ज्यामुळे तो काही तासांमध्ये श्रीमंत झाला आहे. तर तो नेमका कसा श्रीमंत झाला ते जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जैक्सन फॉल नावाच्या व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने आपण एक कंपनी स्थापन केल्याचा दावा केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने ही कंपनी एका दिवसात उभी केल्याचं सांगितलं आहे. त्याने आपले बजेट सांगत AI ला विचारले की, जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील? या प्रश्नावर त्याला जे उत्तर मिळालं त्याने त्याचं जीवन बदललं आहे. जॅक्सनने याबाबतची माहीती ट्विटरवर शेअर केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण यश मिळवल्याचेही त्यांने सांगितलं. जॅक्सनने त्याच्या ट्विटर थ्रेडमध्ये लिहिले आहे की, त्याने चॅटजीपीटीबद्दलची बरीच चर्चा ऐकली होती. यानंतर त्याने ChatGPT-4 AI बॉट लोड केलं आणि काही प्रश्न विचारले.
हेही पाहा- १० कोटी वर्षांपूर्वी कशी दिसायची पृथ्वी, कसे निर्माण झाले पर्वत आणि समुद्र? पाहा थक्क करणारा Video
लखपती करणारा ‘तो’ प्रश्न कोणता?
त्याने प्रश्न विचारला की, जर तुम्ही व्यापारी असाल आणि तुमच्याकडे केवळ १०० डॉलर्स (८ हजार रुपयांपेक्षा थोडे जास्त) पैसे असतील, तर कमीत कमी वेळेत, जास्तीत जास्त पैसे मिळवायचे आहेत, तेपण काहीही चुकीचे काम न करता, यासाठी काय मार्ग असू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरात, ChatGPT ने त्याला ऑनलाइन व्यवसायाची कल्पना सुचवली आणि सांगितले की, यातून तुम्ही पाहिजे तितके पैसे कमवू शकता.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जॅक्सन हे पाहून आश्चर्यचकित झाला. शिवाय तो प्रश्न विचारत राहिला आणि ChatGPT त्याला उत्तर देत होता. यावेळी ChatGPT ने जॅक्सनला एक वेबसाइट बनवण्याची सूचना केली. शिवाय डोमेनचे नाव, लोगो, वेबसाइट डिझाइन, लेख इत्यादी बनवण्यातही त्याची मदत केली. इतकंच नवहे तर त्याला ब्रँडिंगची पद्धतही शिकवली. शिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन ठेवण्याच्या सूचना दिल्या.
सर्वात महत्वाचे म्हणजे जॅक्सनला गुंतवणूक कशी येऊ शकते हेदेखील ChatGPT ने सांगितले. जॅक्सनने चॅटजीपीटीचे सर्व सूचनाचे पालन केलं आणि त्याची कंपनी एकाच दिवसात तयार झाली. जॅक्सनने सांगितलं की, आज माझ्या फर्ममध्ये अनेक गुंतवणूकदार असून सध्या फर्मचे बाजार मूल्य २५ हजार डॉलर म्हणजेच २० लाख ६० हजार रुपयांपेक्षाही जास्त आहे.
जॅक्सनच्या म्हणण्यानुसार, त्यांची कंपनी दोनच दिवसांपूर्वी १५ मार्चला स्थापन करण्यात आली होती. सध्या या कंपनीकडे जवळपास दीड लाख रुपये रोख आहेत. आता जॅक्सनने चॅटजीपीटीला आपली कंपनी कशी मोठी करायची याबाबत प्रश्न विचारला असून त्याआधारे तो पुढील वाटचाल करणार आहे. जॅक्सनच्या या ट्विटला १ कोटी ७० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहेतर ८० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून हजारो नेटकरी त्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत आहेत.