Shocking video: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत एक भयंकर प्रकार उजेडात आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आता पर्यंत आपण दुधात पाण्याची भेसळ केल्याचे पाहिले आहे. आता मात्र दुधाप्रमाणेच पेट्रोलमध्ये देखील पाण्याची भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतल्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क पाणी भरण्यात आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हिडीओमध्ये काही जण बॉटल घेऊन पेट्रोल पंपावर गेल्याचं पाहायला मिळतंय, त्यानंतर पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी बॉटलमध्ये मशीनमधून पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बॉटलमध्ये पेट्रोलच्या ऐवजी पाणी भरलं जात असल्याचं निदर्शनास आलं. काही ग्राहकांना पेट्रोलमध्ये काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं त्यामुळे या पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या आडून पाणी तर विकलं जात नाही ना, असा प्रश्नही अनेकांना पडला. तेव्हा एका बाईक चालकानं बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास सांगितलं आणि त्यानंतर जे दिसलं त्यानं सर्वांनाच धक्का बसला. स्थानिकांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला पेट्रोलच्या ऐवजी मशीनमधून पाणी निघत असल्याची विचारणा केली असता त्यानी उडबा उडवीची उत्तरं दिली. लोकांनी आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून, पाहता पाहताच तो वाऱ्यासारखा पसरला आहे.

One mistake and the game is over Young man's unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
pune viral video man break all traffic rules
पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक
Bhiwandi Live Accident at Rajiv Ghandhi Flyover shocking video
VIDEO: भिवंडीमधला थरारक लाईव्ह अपघात; कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भयंकर घडलं, सांगा चूक नक्की कुणाची?
Wedding video groom denies chain from father in law during marriage viral video on social media
जावई नंबर १! भरलग्नात नवरदेवाने सासऱ्यांचा आग्रह नाकारला, ‘ती’ गोष्ट घेण्यास दिला नकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
old cople Video goes viral
“तूपात तूप गायीचे….”, आजोबांनी आजींसाठी घेतला भन्नाट उखाणा, सुंदर नात्याचा Viral Video एकदा बघाच
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने बॉटलमध्ये पेट्रोल भरलं असताना त्यात एक लिटरच्या बॉटलमध्ये अक्षरश: अर्ध्यापेक्षा जास्त पाणीच होतं. हा व्यक्ती व्हिडीओमध्ये दावा करतोय की पेट्रोलमध्ये पाणी असून हे मुंबईतील कुर्ला येथील एका पेट्रोल पंपावर हा प्रकार घडत आहे. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना हा व्यक्ती जाब विचारत आहे मात्र कुणीही त्याला उत्तर देत नाहीये. आधीच एवढी महागाई आणि त्यात हे प्रकार पाहून सर्वच संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>VIDEO: भिवंडीमधला थरारक लाईव्ह अपघात; कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भयंकर घडलं, सांगा चूक नक्की कुणाची?

पेट्रोल पंपवाले पूर्ण पैसे घेत असून, पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे गाड्या खराब होत आहेत. अशा पेट्रोल पंप मालकांविरोधात कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे. तसेच त्या पेट्रोल पंप चालकांचा परवाना रद्द केला पाहिजे, अशी मागणी तक्रारकर्त्यानं केली आहे.

Story img Loader