लग्न….हा पवित्र सोहळा असतो. लग्न सोहळ्यात विधीवत पती पत्नीच्या पवित्र नात्याची गाठ आयुषयभरासाठी बांधली जाते. प्रत्येक जोडप्यांसाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या सोहळ्याला खूप महत्व असते. त्या सोहळ्यातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट अत्यंत खास असावी असे प्रत्येक जोडप्याला वाटतं. आपलं लग्न सोहळा खास व्हावा यासाठी अनेक जोडपे काही ना काही भन्नाट कल्पना शोधतात. कोणी डेस्टिनेशन वेडिंग करते तर कोणी सध्या पद्धतीने पारंपरिक लग्न करते. कोणी लग्नाची पत्रिका देखील हटके पद्धतीने बनवतात जेणेकरून त्यांचा विवाह सोहळा अविस्मरणीय होईल. सध्या अशीच एक भन्नाट लग्नपत्रिका चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
virajixgया एक्स खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये फक्त एक रुमाल दिसत. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की हा रुमालच खरं तर लग्नपत्रिका आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. या रुमालावर चक्क लग्नपत्रिका छापली आहे…विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा.
हेही वाचा – “फुलांचा नव्हे, हा तर पाणीपुरी बुके!”, कुटुंबाने लाडक्या लेकीला वाढदिवशी दिले भन्नाट गिफ्ट, Video Viral
व्हिडिओच्या सुरवातीला एका टेबलावर एक रुमाल ठेवल्याचे दिसते पण त्याचे घडी मोडताना लक्षात येते की ही तर लग्नपत्रिका आहे कारण त्यावर नवरा नवरीचे नाव दिसते. त्यानंतर आणखी एक घडी उघडल्यावर लग्नाची तारीख, वार आणि स्थळ दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा रुमाल धुतल्यानंतर दोन तासात त्याची शाई निघून जाते आणि त्याचा रुमाल म्हणून वापर करता येतो असेही व्हिडीओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओ पाहून नेटकाऱ्यांना धक्का बसला आहे.
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, लग्नपत्रिका छापण्याची नवी कल्पना. लग्न झाल्यानंतर तुम्हाला ती फेकून देण्याची आवश्यकता नाही तुम्ही ती पत्रिका पुन्हा वापरू शकता.
हेही वाचा – जर तुम्हाला केदारनाथला यायचे असेल तर कृपया ‘हा’ व्हिडिओ पहा, सीतापूरमध्ये अडकले हजारो यात्रेकरू
ही हटके कल्पना लोकांना प्रचंड आवडली आहे. व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत आणि कमेंट करत आहेत. काही इको फ्रेंडली कल्पना फार आवडली तर काहींनी ही पत्रिका किती रुपयांनी मिळेल अशी विचारणा केली. एकाने लिहिले,” हा जुना ट्रेण्ड आहे, आता पुन्हा व्हायरल होत आहे.२०१० ला माझ्या मित्राच्या लग्नात रुमलावर लग्न पत्रिका छापल्या होत्या. झणकार कार्ड, प्रभात थिएटर समोर छापल्या होत्या.”
“लग्नाच्या प्रमाणपत्र म्हणून काय जमा करणार”,असा प्रश्नही दुसऱ्याने विचारला.
काहींनी खूप सुंदर, टिकाऊ, ….अशा शब्दात कौतुक केले.