प्रत्येक प्राण्याकडे बचाव करण्यासाठी एक विशिष्ट गोष्ट किंवा ताकद आहे. एखादी गोष्ट जिवावर आल्यानंतर प्राणी त्यावेळी आपलं बचाव करतात.. बिबट्यानं हल्ला केल्यानंतर साळिंदरनं त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. साळिंदर आणि बिबट्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
साळिंदर आणि बिबट्याच्या लढाईचा हा व्हिडीओ वन आधिकारी जगन सिंग यांनी आपल्या ट्विटरवर टाकला आहे. प्रत्येक सजीव व्यक्तीकडे आपलं संरक्षण करण्यासाठी एक विशिष्ट तंत्र असतं आणि त्याचा योग्य वापर करण्याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सिंग यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याला साळींदरने पळवून लावल्याचं या व्हिडीओत दिसतेय.
साळिंदर काटेरी असल्यामुळे शिकार तर दूरच पण उभं राहण्याची चेष्टा कोणी करणार नाही. साळिंदराच्या अंगावर उभे राहणारे काटे पाहू आपल्यालाच शहारे येतात. तिथे मात्र शिकारीचे नवे डावपेच शिकलेल्या बिबट्याच्या पिल्लानं त्याची शिकार करण्याचं धाडस केलं आणि फसला.
Every Living organism will hav some Defence Mechanism, Watch Porcupine here @dfoatp @drqayumiitk @NaturelsLit @Iearnsomethlng @RandeepHooda #wildlife #selfdefense #forest #wildanimal pic.twitter.com/AGJtDWKpkz
— Jagan Singh IFS (@IfsJagan) July 31, 2020
बिबिट्या अंदाज घेऊन साळिंदरवर वार करत असल्याचं या व्हिडीओत आपल्याला दिसतेय. पण त्याचवेळी साळिंदरानं एक जोरात आपल्या काट्यांनी बिबट्याला फटका मारला. काटे पाहून बिबट्या माघारी फिरला. या मजेशीर व्हिडीओ आतापर्यंत चार हजार लोकांनी पसंती दर्शवली आहे.