Cheetah Hunting Viral Video : बिबट्या, वाघ, सिंहालाही घाम फोडणारा चित्ता वाऱ्याच्या वेगासारखा सुसाट धावत सुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जवळपास २२ फुटांची झेप घेत चित्त्याने धुम ठोकल्याचा थरारक व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. तासाला ७० मैल अतंर पार करणारा चित्ता शिकारीसाठी भरधाव वेगानं धावत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. जमिनीवर धावणारा जगातील सर्वात वेगवान प्राणी म्हणून चित्त्याने ठसा (Acinonyx jubatus) उमटवला आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांनाही धूळ चारेल असा हा चित्ता इंटरनेटरवर नेटकऱ्यांच्या नजरेत हिरी बनला आहे. चित्ताने मारलेली उंच झेप कॅमेरात कैद झाल्यानं या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्ताचा धावण्याचा वेग पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ताशी ७० मैल अंतर पार करणाऱ्या चित्त्याचा थरारक व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
@Fascinating नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. शिकारीसाठी चित्ता वाऱ्यासारखा धावत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलंय, जवळपास २२ फूट लांब झेप घेत वेगानं धावणारा चित्ता ताशी ७० मैल अंतर पार करतो. हा थरारक व्हिडीओ पाहून इंटरनेटवर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने आतापर्यंत या व्हिडीओला ९ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “एक जबरदस्त जंगली मांजर, तासाला ७५ मैल अंतर पार करणारा चित्त्याचं शीर धावताना स्थिर असतं, जसं एखादा घुबड शिकारीसाठी टक लावून बसलेला असतो.” दुसरा नेटकरी म्हणाला, आपणही या जगात राहतो, या भूतलावर अशा क्रिएचरचं जबरदस्त गिफ्ट मिळालं आहे.” अन्य एक नेटकरी प्रतिक्रिया देताना म्हणाला, “पाठीचा कणा लवचीक असल्याने चित्ता खूप वेगवान असतो.” “मी दक्षिण आफ्रिकेत अशाच प्रकारचे दोन चित्ता पाहिले. त्यांचाही वेग जबरदस्त होता.”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं. वाघ, सिंह, बिबट्यासारखे हिंस्र प्राणी शिकारीसाठी नेहमीच रानावनात भटकतात. पण काही वेळेला धावताना वेग कमी पडला की, हरणासारखा चपळ प्राणी अशा प्राण्यांना चकवा देत त्यांच्या तावडीतून सुटतो. पण चित्तापुढं धावणं म्हणजे या प्राण्यांच्या नाकी नऊ आल्याशिवाय राहणार नाही.