चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे. तो ताशी ८० ते १२० प्रती कि.मी. वेगाने पळू शकतो. त्यामुळे समोरील प्राणी कितीही वेगवान असला तरी तो चित्त्याचा सामना करू शकत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क एका मगरीनं चित्त्याशी पंगा घेतला आहे. मगर ही सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक आहे. एका हल्ल्यात तो समोरच्या प्राण्याचे अक्षरश: दोन तुकडे करते. त्यामुळेच मगरीला किलिंग मशीन असं सुद्धा म्हणतात.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधून दिसून येतं की, जंगलात अशक्य असं काहीही नाही. जंगलातील काही दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. बिबट्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर एका तहानलेल्या चित्त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण तहानलेल्या चित्त्याला काही सेकंदात आपला जीव गमवावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी चित्ता सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

मगरीनं चित्त्यावर एवढा वेगवान हल्ला केला आहे की चित्त्याला काही कळायच्या आतच त्याची शिकार झाली होती.

सोशल मीडियावर अनेक वेळा आश्चर्यकारक व्हिडिओ समोर येत आहेत. असे व्हिडिओ लोकांना विचार करायला भाग पाडतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मगर चित्त्यावर हल्ला करून त्याला ठार मारते. हा हल्ला एवढा वेगवान आहे की चित्त्याला अजिबात समजत नाही आणि चित्ता आपला जीव गमावतो. या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: बापरे! भररस्त्यात महिला पोलिसासोबत मुलाचं धक्कादायक कृत्य, आधी मिठी मारली अन् मग…

व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कोणत्याही प्राण्याला कमकुवत समजण्याची चूक करू नका.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘विश्वासच बसत नाही की असे होऊ शकते’, तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘मला चित्त्याबद्दल वाईट वाटते.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheetah vs crocodile predator becomes prey watch shocking viral video wild animals latest videos srk