दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया या देशाच्या चित्त्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याअंतर्गत ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेतून ५ ते ६ चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. नामिबियातून चित्ता आणण्याची प्रक्रिया प्रलंबित असून ती परराष्ट्र मंत्रालयाकडे अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत मध्य प्रदेशातील श्योपूर येथे असलेल्या कून अभयारण्यात चित्त्यांना आणण्यात येणार आहे. यासाठी दक्षिण आफ्रिकेतील तज्ञांची टीम १५ जून रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने ३० ते ४० चित्ते भारतात येतील. पहिल्या टप्प्यात केवळ पाच ते सहा चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत.

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील तज्ञांची टीम भारताच्या परिसंस्थेमध्ये मोठ्या मांजरीच्या प्रजाती कशी वागतात हे पाहतील. ते हवामानाशी कसे जुळवून घेतात? त्यानंतरच चित्यांची पुढची तुकडी आणली जाईल.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
MATES scheme for indian
भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

आणखी वाचा : बाटलीने दूध पितं हे हत्तीचं पिल्लू, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “खूपच क्यूट”

मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्ते आणण्यासाठी तांत्रिक पथकाची पाहणी करण्यात आली आहे. भारतातून ७० वर्षांपूर्वी चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यांना आफ्रिकेतून आणण्याची कसरत अनेक दशके जुनी आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या कामाला गती देण्यात आली असून दोन वर्षांहून अधिक काळ विलंब झाल्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा चित्ते आणण्याची कसरत सुरू करण्यात आली आहे. त्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण- NTCA, वन्यजीव संस्थेतील प्रत्येकी एक अधिकारी समाविष्ट होता. याशिवाय देहरादून वन्यजीव संस्था, मध्य प्रदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नामिबियाला भेट दिली.

आणखी वाचा : मशीनच्या वेगाने व्यायाम करणाऱ्या चिनी मुलांचा VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले, ‘छोटे निन्जा’

२०१० मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी सर्वप्रथम भारतात चित्तांचा बंदोबस्त करण्याची योजना सुरू केली होती. या अंतर्गत १२ ते १४ चिते आणण्यात येणार होते. यामध्ये आठ ते दहा नर आणि चार ते सहा मादी चित्ता येणार होते. आता ही संख्या चाळीस झाली आहे. भारताने १९५२ मध्ये चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले. सध्या देशातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात किंवा वन्यजीव अभयारण्यात चित्ता नाही.