Viral video: चेन्नईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकांचे टोमणे आणि सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला कंटाळून एका आईने आपले जीवन संपवले आहे.यामुळे तिची दोन्ही मुलं अनाथ झाली आहेत. चेन्नईतील एका इमारतीत एक बालक चौथ्या मजल्यावरून पडून शेडला लटकल्याचा एक व्हिडीयो खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी खूप प्रयत्नांनंतर त्या बालकाला वाचवण्यात यश आले होते. मात्र नंतर बालकाच्या आईला खुप ट्रोल करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला चेन्नईतील उंच इमारतीच्या छतावर पडलेल्या चिमुकलीचा व्हिडिओ आठवतो? यावेळी सोशल मीडियावर लोकांनी आपला जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले. मात्र आईवर टीका करत तिला चांगलेच ट्रोल केले. तिच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला. बाळाच्या आईने १८ मे रोजी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. चेन्नईस्थित आयटी कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रम्याला इंटरनेटवर तिच्या निष्काळजीपणाबद्दल ट्रोल करण्यात आले होते. निष्काळजीपणामुळे मुल खाली पडलं असे टोमणे तिला एकवले जात होते. ३३ वर्षीय बाळाची आई तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली.

सोशल मीडियावर ट्रोल केल्यानं आईनं जीवन संपवलं

कोईम्बतूरमधील करमादई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर महिला खूप तणावात होती. होत असलेल्या ट्रोलिंगमुळे ती कंटाळली होती. ट्रोलिंगला कंटाळून ही महिला दोन आठवड्यांपूर्वी पती आणि मुलांसह तिच्या माहेरी गेली होती.इथेही तिला होणारा त्रास कमी झाला नाही. शेवटी कंटाळून तिने आपले जीवन संपवले. महिलेला दोन मुले असून त्यापैकी एक पाच वर्षांचे तर दुसरे आठ महिन्यांचे आहे.

नक्की काय घडलं होतं?

चेन्नईमध्ये लहान बाळ गॅलरीमधून पडून इमारतीच्या पत्र्यावर अडकलं होतं. एक-एक जण खिडकीतून बाहेर येऊन दुसऱ्याची मदत घेऊन बाळाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण अनेकांचा हात पोहचत नव्हता. दरम्यान एका व्यक्तीने स्वत:चा जीव धोक्यात घालत बाळाला या छतावरून खाली काढले. या व्यक्तीच्या धाडसाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.नशिब बलवत्तर म्हणून हे बाळ बचावलं आहे. बाळ अखेर सुखरूप आल्याने लोक आनंदात होते. बाळ आता बरे असून प्राण वाचवल्याबद्दल बाळाच्या पालकांनी सोसायटीतील लोकांचे आभार मानले आहेत.

पाहा काय घडलं होतं

हेही वाचा >> स्टेशनवर पाण्याची बॉटल घ्यायला उतरला अन्…अवघ्या ३३ सेकंदात रेल्वेखाली गेला; उत्तराखंड स्टेशनवरचा थरारक VIDEO

तज्ज्ञांच्या मते,सोशल मीडियावर अपमानास्पद भाषा किंवा कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह ट्रोल वापरल्यास ते सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत येते.यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai 33 year old mother of rescued toddler dies by suicide after being trolled for negligence shocking video srk