Chennai Baby Rescue Video: सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ चेन्नईमधून समोर आला आहे. यामध्ये एक लहान बाळ गॅलरीमधून पडून इमारतीच्या पत्र्यावर अडकलं होतं.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लहान बाळ बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीवरील प्लास्टिकच्या छतावर अडकले होते. दूध पाजताना ८ महिन्यांची चिमुकली हातातून सटकल्याचे बोलले जात आहे. सोसायटीतील सर्व लोक या बाळाला कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे बाळ खूप रडत होते तर दुसरीकडे या बाळाला वाचवण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरु होते. लोकांनी इमारतीच्या खाली मोठा कपडा पकडून तर कोणी गॅलरीच्या बाहेर येत बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे रेस्क्यू ऑपरेशन पाहताना बघणाऱ्यांचाही श्वास थांबला होता. कारण बाळाची थोडीशी हालचाल बाळाला मृत्यूच्या दारात घेऊन जाणार होती.

देव तारी त्याला कोण मारी!

एक-एक जण खिडकीतून बाहेर येऊन दुसऱ्याची मदत घेऊन बाळाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण अनेकांचा हात पोहचत नव्हता. दरम्यान एका व्यक्तीने स्वत:चा जीव धोक्यात घालत बाळाला या छतावरून खाली काढले. या व्यक्तीच्या धाडसाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.नशिब बलवत्तर म्हणून हे बाळ बचावलं आहे. बाळ अखेर सुखरूप आल्याने लोक आनंदात होते. बाळ आता बरे असून प्राण वाचवल्याबद्दल बाळाच्या पालकांनी सोसायटीतील लोकांचे आभार मानले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: विद्यार्थ्यानं उत्तरपत्रिकेत ‘जय श्री राम’बरोबर लिहलं असं काही की…पास करणाऱ्या शिक्षकांनाही केलं निलंबित

@payal_mohindra नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत.