आजी-आजोबा आणि नातवंड यांचे नाते खूप निर्मळ आणि प्रेमळ असतो. आजी-आजोबा सर्वात जास्त प्रेम आपल्या नातवंडावर करतात. नातवंडाचे लाड पुरवण्यात आजी-आजोबांचा आनंद असतो. नातवंडेही आजी-आजोबांकडे सर्व हट्ट करतात. अशाच काही नातवंडाचा हट्ट पुरवणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ चेन्नईतील आहे जिथे सध्या पुरस्थिती निर्माण झाली आहे.

३० नोव्हेंबर रोजी पुद्दुचेरी-तामिळनाडू किनारपट्टीवर फेंगल चक्रीवादळाच्या लँडफॉलच्या आधी व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. चेन्नईतील एका व्यक्तीने पूरग्रस्त निवासी संकुलात आपल्या नातवडांना छोट्याश्या बोटीमध्ये बसवून पुराच्या पाण्यातून फिरवले आहे. हा वव्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

व्हिडीओमध्ये दिसते की, एक वृद्ध व्यक्ती स्कुटरवर बसलेला आहे आणि एक छोटीशी बोट दोरीने स्कुटरला जोडली आहे. बोटीमध्येआपल्या नातवडांना बसवले आहे. स्कुटरवर बसून हा व्यक्ती घरासमोरील अंगणात साचलेल्या पाण्यातून स्कूटर पाणी फिरवतो आणि स्कुटरबरोबर बोटही अंगणात साचलेल्या पाण्यावर तंरगते. घरासमोर साचलेल्या पाण्यात बोटींगचा आनंद या चिमुकल्यांनी लुटला आहे. आपल्या नातवंडाच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहण्यासाठी आजोबांनी देखील भन्नाट जुगाड शोधला आहे. व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

हेही वाचा – किती ही क्रूरता! उंटाचे पाय दुमडून बसवले चक्क बाईकवर, Viral Video पाहून संतापले लोक

एक्सवर @Chai_Angelicनावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करतान कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”चेन्नईमध्ये चक्रीवादाळादरम्यान, एक आजोबा आपल्या नातवंडांबरोबर”

हेही वाचा – चंद्राच्या प्रकाशात उजळले केदारनाथ धाम मंदिर! आनंद महिंद्रांना आवडला सुंदर फोटो, तोंड भरून केले कौतुक

व्हिडाओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, “मी कल्पनाही केली नव्हती की चक्रीवादळ इतके मजेशीर असू शकते”

दुसऱ्याने लिहिले की, आजोबा हे नातवंडाचे पहिले मित्र असतात आणि नातवंड हे आजोबांचे शेवटचे मित्र असतात”

तिसऱ्याने लिहिले, “परिस्थिती काहीही असली तरी स्वत:ला नेहमी आनंदी ठेवा”

हेही वाचा – पाकिस्तानी पॅराग्लायडरने तर हद्दच केली राव! लँडिग करताना अंदाज चुकला अन् थेट…. थरारक Viral Video एकदा बघाच

फेंगल चक्रीवादळाचा जोर वाढल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर तामिळनाडूवर सध्या मजबूत कमी दाब असलेली ही प्रणाली अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असताना ती तीव्र होण्याचा अंदाज आहे.

केरळच्या कासरगोड, कन्नूर, वायनाड, कोझिकोड आणि मलप्पुरम या पाच उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी आहेत. पलक्कड, थ्रिसूर, इडुक्की आणि एर्नाकुलमसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोट्टायम, अलाप्पुझा आणि पठानमथिट्टा पिवळ्या अलर्ट अंतर्गत आहेत

Story img Loader