असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये एकतरी कला असते. प्रत्येकामध्ये कलाकार दडलेला असतो. त्यातल्या त्यात आपल्या देशात टॅलेंटची काही कमी नाही. कधी कधी तर असं टॅलेंट बघायला मिळतं की ते पाहून आश्चर्य वाटू लागतं. म्हणजे आपल्याला विश्वास बसत नाही की, हे असंही करू शकतात. हल्लीची तरूणाई आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी कोणत्या मंचाची वाट पाहत बसत नाही. बस जिथे योग्य वेळ आणि जागा मिळाली की ते कुठेही आपली कला सादर करू लागतात. नेमका असाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये मेट्रो ट्रेनमध्ये बसलेले काही तरूण अचानक जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांचं गाणं गाताना दिसून आले. या व्हिडीओमधील तरूणांच्या गोड आवाजावर नेटकरी फिदा झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा या तरूणांच्या गोड आवाजाची भूरळ पडेल.

हा व्हिडीओ काही सामान्य नसून तो लोकांच्या चांगलाच पसंतीस पडतोय. हा व्हिडीओ पाहून या तरुण गायंकाची सर्वांनी प्रशंसा केली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चेन्नई मेट्रोमधून प्रवास करणारे काही तरुण गाताना दिसत आहेत. एरव्ही मेट्रोमध्ये प्रवास करताना कुणी आपल्या कानात ईअरफोन टाकून बसलेला, कुणी आपलं डोके एखाद्या पुस्तकात घातलेलं तर कुणी एखादं वर्तमानपत्र ऐटीत उघडत बातम्या वाचत असताना आपण पाहिलं असेल. पण मेट्रोमधल्या कंटाळवाण्या प्रवासाला आणखी मजेदार करण्यासाठी या व्हिडीओमधल्या तरूणांनी जो पर्याय शोधलाय, तो पाहून सारेच जण सुखावले आहेत.

Shocking video of drunk man drives car on railway track viral video on social media
बापरे! दारूच्या नशेत गाडी घेऊन थेट रेल्वे रुळावर पोहोचला, VIDEO मध्ये पाहा पुढे नेमकं काय घडलं…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Priyanka Chopra adorable gesture for bhabhi video viral
Video: नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
A young man's impressive Lavani performance on the song Tujya Usla lagl kolha
“नादच नाही भाऊचा!”, ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’ गाण्यावर तरुणाची ठसकेबाज लावणी; तरूणींनाही टाकले मागे, पाहा Viral Video
Emotional video of father running behind train to earn money hardwork video viral
एका बापाची मजबुरी! प्लॅटफॉर्मवरून उडी मारली, ट्रेनच्या मागे धावत सुटला अन्…; ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Tum Hi Ho song played on Dholki
रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
two brothers song sung for mother emotional
आईच्या मांडीवर बसून चिमुकल्याने गायलं ‘तेरी उंगली पकड़ के चला’ गाणं; मुलाचा काळजाला भिडणारा आवाज ऐकून आईला आलं रडू; पाहा VIDEO

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काही वेळात मुखाग्नी देणार तितक्यात डोळे उघडले; सरणावरच आजोबा झाले जिवंत

सर्वांना मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता यावा यासाठी तरुणांनी अगदी मनमोकळ्यापणाने ए आर रेहमान यांच्या गाण्याचे सूर धरले आहेत. हे तरूण ए आर रहमान यांच्या ‘अथांगरा मरामेचे’ हे गाणं गाताना दिसून येत आहेत. एका तरूणाने हातात गिटार धरत धून वाजवताना दिसतोय. तर दुसऱ्या एका तरूणाने हातात पियानो धरत गाण्यावर आपला ताल धरला आहे. तरूणांच्या या गाण्याला प्रवाशांनी देखील साथ दिली. काही प्रवासी तर या तरूणांमध्ये सामील होत कुणी सीटवर हाताने वाजवत तर कुणी आपल्या मोबाईलमध्ये गाण्याची लिरीक्स उघडत त्यांच्या सुरात सुर लावले. काही प्रवासी तर या सुखद प्रसंगाला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : विमानात पहिल्यांदा तुलू भाषेतून प्रवाशांचं झालं स्वागत… मुंबई-मंगळुरु फ्लाइटमधला हा व्हिडीओ पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL NEWS : बापरे! अलेक्साने १० वर्षांच्या मुलाला धोकादायक ‘आउटलेट चॅलेंज’ सुचवलं…

या व्हिडीओमध्ये ए.आर. रेहमान यांचं हे गाणं गाताना तरूणांचा जोश पाहण्यासारखा होता. मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करणारे सारेच जण या तरूणांच्या गोड आवाजाने मोहीत झाले आणि हे पाहण्यासाठी आजुबाजुला गर्दी करू लागले. मेट्रोमध्ये गर्दीमध्ये उभे राहून हे तरुण गाणं अगदी तन्मयतेने गातायत. या गाण्यात असेलल्या चढउतारांची हे तरुण जसीच्या तसी नक्कल करत आहेत.

हा व्हिडीओ anupr3 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना तो इतर सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह मात्र आवरता येत नाहीय. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ८८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १६५४ पेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ रिट्वीट केलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “हीच आमच्या भारताची खरी ओळख आहे. देशात छोट्या छोट्या जागेवर टॅलेन्ट लपलेला आहे, अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Story img Loader