चेन्नई : चेन्नईतील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी ‘कासाग्रॅण्ड’ने आपल्या १,००० कर्मचाऱ्यांना स्पेनमधील बार्सिलोनामध्ये आठवडाभराच्या ट्रिप भेट दिली आहे. ही ट्रिपची संकल्पना कंपनीच्या ‘प्रॉफिट-शेअर बोनस प्रोग्रॅम’चा भाग आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला जातो.

२०१३ मध्ये ५० कर्मचाऱ्यांना सिंगापूरला नेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी ही परंपरा चालू ठेवून कर्मचाऱ्यांच्या संख्या वाढत गेली. दुबई, मलेशिया, लंडन यांसारख्या देशांमध्ये कर्मचाऱ्यांना नेण्यात आले. कोरोनानंतरही कंपनीने ही परंपरा सुरू ठेवत अबुधाबी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी ट्रिपचे आयोजन केले. यावर्षी बार्सिलोना दौऱ्याने या उपक्रमाला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Uber driver offer different facilities
‘फ्लाइटपेक्षा उत्तम…’ कॅबमध्ये खाण्यापिण्याची सोय पाहून प्रवासी झाला खूश; PHOTO शेअर करीत म्हणाला…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
watermelon Raigad demand Dubai business export
रायगडच्या कलिंगडांना दुबईत मागणी
ITC Hotels To Be Second Largest Hotel Company By Market Cap
आयटीसी समूहातील ‘या’ हॉटेल कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
Delhi assembly elections, Delhi assembly election news
गुगल मॅपनं दिला दगा, फ्रान्सच्या सायकलस्वारांना नेपाळ ऐवजी पोहोचवले…
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध

बार्सिलोनामध्ये ‘साग्राडा फॅमिलिया’ आणि ‘पार्क गुएल’सारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळे, ‘मॉंटज्युइक किल्ला’ आणि शांत समुद्रकिनारे यांचा अनुभव घेण्याची संधी कर्मचाऱ्यांना दिली. कंपनीने विमान प्रवास, आलिशान निवास व्यवस्था, मार्गदर्शकांसह पर्यटन, स्वादिष्ट जेवण आणि सांस्कृतिक अनुभव यांसाठी विशेष व्यवस्था केली.

हेही वाचा –काय सांगता? पुण्यात FC रोडवर दिसला दिलजीत दोसांझ? Video Viral, जाणून घ्या काय आहे प्रकरण…

“आम्हाला कर्मचार्‍यांची मेहनत आणि त्यांचे योगदान महत्त्वाचे वाटते. पारंपरिक पद्धतींपलीकडे जाऊन आम्ही अशा अनुभवांद्वारे त्यांचे कौतुक करतो. हे उपक्रम त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात,” असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा –बाप रे! मिनीरोबोटने केले १२ मोठ्या रोबोट्सचे “अपहरण”, चीनमधील सत्यघटना! Video Viral

‘कासाग्रॅण्ड’चा हा अनोखा उपक्रम कर्मचारी-केंद्रित संस्कृतीचे प्रतीक मानला जात असून, उद्योग जगतात कौतुकाचा विषय ठरला आहे. ‘कासाग्रॅण्ड’च्या या उपक्रमामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा आनंद आणि एकोपा वाढवण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो नक्कीच प्रेरणादायी ठरतो.

Story img Loader