चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज डेव्हन कॉनवेने अलीकडेच सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या हंगामातील त्याच्या सहकाऱ्यांसह त्याची प्री-वेडिंग पार्टी केली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशल युट्युब सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला, जिथे खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे सर्वोत्तम पारंपारिक कपडे घालून नेटीझन्सना त्यांचे भारतीय रूप दाखवले. व्हिडीओमध्ये, कॉनवे (Conway )आणि त्याची मंगेतर किम वॉटसन (Kim Watson) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांच्या भाषणापूर्वी काही शब्द बोलताना दिसत आहेत. कॉनवे केक कापताना देखील दिसत आहे आणि नंतर त्याच्या टीममेट्सनी त्याच्याच चेहऱ्यावर केक लावताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पार्टीमध्ये काही वेळातच डान्सला सुरुवात होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ड्वेन ब्राव्हो त्याच्या नवीन विकेट सेलिब्रेशन स्टेप्ससह डान्समध्ये त्याच्यासोबत सामील होताना दिसला. एमएस धोनीसुद्धा यात सामील झालेला दिसून येतोय.

(हे ही वाचा: अवघ्या ५०रुपयांत ‘हे’ वृद्ध जोडपं खाऊ घालतंय पोटभर जेवण; Viral Video बघून नेटकरी झालेत फॅन)

(हे ही वाचा: Viral Video: हरणाच्या शेपटातील फर काढून कावळ्याने बनवले घरटे, व्हिडीओ बघून नेटकरी आश्चर्यचकित)

कॉनवेला फेब्रुवारीमध्ये आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने एक कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मोसमाच्या सलामीच्या सामन्यात त्याने पदार्पण केले होते, परंतु तो केवळ तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या जागी मोईन अलीने संघात स्थान मिळवले.

(हे ही वाचा: Viral Video: बॉक्सिंग चँपियन माइक टायसननं विमानातच केली प्रवाशाची धुलाई, कारण…)

कॉनवे लग्न झाल्यावर संघात परत येईल. सीएसकेची मोसमातील सुरुवात कठीण होती आणि त्यांनी पहिले चार सामने गमावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांनी हंगामातील पहिला विजय मिळवला, परंतु गुजरात टायटन्सविरुद्धच्या त्यांच्या पुढील सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सवर मात करून त्यांचं हंगामातील स्थान जिवंत ठेवलं आहे. त्यांचा पुढील सामना सोमवारी पंजाब किंग्जशी होणार आहे.