आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मागच्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालीस चेन्नई संघाने आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. मात्र यंदाच्या आयपीएल २०२२ स्पर्धेत चेन्नईची कामगिरी निराशाजनक आहे. चेन्नईच्या संघामध्ये मोठे बदल झाल्याचं दिसत असून धोनीने कर्णधार पदाची जबाबदारी रविंद्र जडेजाकडे सुपूर्द केली आहे. या बदलचा मोठा परिणाम आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये दिसून आला आहे. कर्णधार रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे या संघात सुरेश रैनाची उणीव दिसून येत आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनासाठी कोणीही रस दाखवलेला नव्हता. चेन्नई सुपर किंग्जसह कोणत्याही संघाने रैनासाठी बोली लावली नाही. त्यातच रैनाने निवृत्तीही जाहिर केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरेश रैना हा आजही आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार खेळाडू म्हणून ओळखला जातो. रैनाने २०५ सामन्यात पाच हजार ५२८ धावा केल्या. चार वेळा आयपीएल विजेता असलेल्या चैन्नई सुपरकिंग्जचा रैना हा एक आधारस्तंभ राहिला होता. २०१६ आणि २०१७ मध्ये गुजराज लायन्सचे नेतृत्वही रैनाने केलं होतं. चेन्नईच्या संघामध्ये रैनाला स्थान न देण्यात आल्याने चेन्नईच्याच अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्टार स्पोर्ट्सवरील सामन्याआधीच्या कार्यक्रम आणि चर्चासत्रामध्ये रैना सहभागी झाला होता. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना रैना स्वत: चेन्नईच्या संघाच्या आठवणीमध्ये भावूक झाल्याचं दिसला. त्याने हसता हसता पुन्हा एकदा चेन्नईसाठी खेळण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. “मी मैदानाजवळून या शोसाठी येत असताना मला असं वाटलं की मी लगेच पिवळी जर्सी घालून मैदानात प्रवेश करावा,” असं रैना म्हणाला होता. आता सलग तीन पराभवानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी मीम्स शेअर करत रैनाला संघात घेण्याची मागणी केली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉन्वे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महीष तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग.