‘फ्लाईंग जट’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. आपल्या चित्रपटचे प्रमोशन करण्यासाठी जॅकलिन आणि टायगरने नवा फंडा शोधून काढला आहे. त्यांनी या चित्रपटातल्या ‘बीट पे बुटी’ या गाण्यावर नाचून दाखवण्याचे आव्हान बॉलीवूड स्टार्सना दिले आहे. आता खुद्द जॅकलिने आव्हान दिले आणि ते पूर्ण केले नाही तर नवलच म्हणावे लागेल. त्यामुळे बॉलीवूडमधल्या अनेकांनी ‘बीट पे बुटी’ गाण्यावर ठुमके लावले आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर अपलोड केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या ‘बीट पे बुटी’ चॅलेन्जची हवा आहे. आतापर्यंत सोनाक्षी, वरुण धवन, क्रृती, सनीने या गाण्यावर आपापल्या स्टाईलने डान्स करून दाखवला. आता ही सगळी झाली बॉलीवूडची मंडळी. ज्यांना डान्स करणे ठाऊक आहे, पण या सगळ्यामध्ये चर्चा झाली ती लेखक चेतन भगत याच्या डान्सची.
चेतनचा हा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी चेतनची खिल्ली उडवली आहे पण चेतनचा आतापर्यंतचा हा सगळ्यात विनोदी डान्स होता अशीही प्रतिक्रिया नेटीझन्सने दिली आहे. चेतन ‘नच बलीये’ या डान्स शोचा परिक्षकही होता त्याला नाच येत नसतानाही त्याला या शोचा परिक्षक बनवले गेल्यामुळे याआधी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. चेतनचा हा डान्स पाहून त्याचे कारणही लक्षात आले असेल, पण ते काही असले तरी चेतनने बीट पे बुटीमध्ये ठुमके लावत अनेकांचे मनोरंजन केले हे नक्की. या व्हिडिओमध्ये चेतनसोबत अर्जून कपूर आणि श्रद्धा कपूर देखील आहे. चेतन भगतच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कांदबरीवर ‘हाफ गर्लफ्रेंड’ नावाचा चित्रपट देखील येत आहे यात अर्जून कपूर आणि श्रद्धा कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा