प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांना नेटीझन्सच्या अनपेक्षित प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. त्यांनी लिहलेल्या ‘वन इंडियन गर्ल्स’ या कादंबरी अर्थहीन असल्याचे सांगण्यासाठी काही वाचकांनी या कादंबरीला रद्दीमध्ये फेकल्याचे दिसत आहे. कादंबरीवर प्रतिक्रिया मागितल्यानंतर नेटीझन्सनी पुस्तकाचे लेखक चेतन भगत यांची थट्टा केली. चेतन भगत हे सोशल मिडियावर सक्रिय असून आपल्या वाचकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. या अनुषंगाने आपल्या नव्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या पुस्तकाचे प्रकाशन आठवडयापूर्वी झाले होते. सोमवारी चेतन भगत यांनी आपल्या वाचकांसाठी एक ट्विट केले. या ट्विटममध्ये त्यांनी वाचकांना आपल्या पुस्तकाचा फोटो पाठविण्याचे आवाहन केले होते. पुस्तकाचा फोटो पाठविणाऱ्या वाचकांना प्रतिसाद देणार असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला होता. त्यांच्या आवाहनानंतर त्यांना जे फोटो मिळाले ते थक्क करणारे असे आहेत. काही वाचकांनी चेतन भगत यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना ‘वन इंडियन गर्ल्स’या कादंबरीला रद्दीमध्ये टाकल्याचे फोटो पाठविले. काही वाचकांनी या कादंबरीला चक्क शौचालयाच्या कोपरा दाखविला. वाचकांनी दिलेल्या अशा प्रतिसादामुूळे चेतन भगत यांना अभिप्राय मागितल्याचा पश्चाताप नक्कीच होत असेल.
चेतन भगत यांची सातवी कादंबरी १ ऑक्टोंबरला प्रकाशित झाली होती. यापूर्वी ‘द थ्री मिस्टेक ऑफ माय लाईफ’, ‘वन नाईट अॅट कॉल सेंटर’ आणि ‘फाइव पॉईंट समवन’ या कादंबऱ्यांच्या त्यांच्या लेखनाला वाचकांनी पसंती दिली होती.
#OneIndianGirl in Mykonos, Greece. Send me pics of the book in a beautiful backdrop. Will RT best ones. Let's see your phone camera skills! pic.twitter.com/nGAF9QiFd0
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) October 10, 2016
Dear Team Jobless, please send pics of #OneIndianGirl with beautiful backdrops, I would RT along with my friend @chetan_bhagat
— Rofl Gandhi Page 57 (@RoflGandhi_) October 10, 2016
@RoflGandhi_ @chetan_bhagat
Saw this cute girl eating bhel ,
She has no idea about #OneIndianGirl pic.twitter.com/3aLiEzPBiE— Ritika Jain (@ritikajain01) October 10, 2016