प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांना नेटीझन्सच्या अनपेक्षित प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. त्यांनी लिहलेल्या ‘वन इंडियन गर्ल्स’ या कादंबरी अर्थहीन असल्याचे सांगण्यासाठी काही वाचकांनी या कादंबरीला रद्दीमध्ये फेकल्याचे दिसत आहे. कादंबरीवर प्रतिक्रिया मागितल्यानंतर नेटीझन्सनी पुस्तकाचे लेखक चेतन भगत यांची थट्टा केली. चेतन भगत हे सोशल मिडियावर सक्रिय असून आपल्या वाचकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. या अनुषंगाने आपल्या नव्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या पुस्तकाचे प्रकाशन आठवडयापूर्वी झाले होते. सोमवारी चेतन भगत यांनी आपल्या वाचकांसाठी एक ट्विट केले. या ट्विटममध्ये त्यांनी वाचकांना आपल्या पुस्तकाचा फोटो पाठविण्याचे आवाहन केले होते. पुस्तकाचा फोटो पाठविणाऱ्या वाचकांना प्रतिसाद देणार असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला होता. त्यांच्या आवाहनानंतर त्यांना जे फोटो मिळाले ते थक्क करणारे असे आहेत. काही वाचकांनी चेतन भगत यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना ‘वन इंडियन गर्ल्स’या कादंबरीला रद्दीमध्ये टाकल्याचे फोटो पाठविले. काही वाचकांनी या कादंबरीला चक्क शौचालयाच्या कोपरा दाखविला. वाचकांनी दिलेल्या अशा प्रतिसादामुूळे चेतन भगत यांना अभिप्राय मागितल्याचा पश्चाताप नक्कीच होत असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा