निसर्गात नेहमीच आपल्याला अद्भुत दृश्य पाहायला मिळत असतात. कधी भयंकर पाऊस, कधी कडक ऊन, कधी त्सुनामी तर कधी चक्रीवादळ. काही दृश्ये खूपच थक्क करणारी असतात तर आणि काही अगदी हृदय पिळवटून टाकणारी असतात. तुम्ही चक्रीवादळ पाहिले असेल. खरं तर वाऱ्याला जेव्हा हिंसक वळण तेव्हा त्याचं रौद्र रूप पाहून अंगावर काटा येतोय. अशाच एक वादळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादरुन जाल, हे मात्र नक्की.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, खूप मोठे वादळ अचानक येते. यामुळे झाडांची पाने आणि धूळ सगळीकडे होते. वादळामुळे एक ट्रक अगदी कागदाप्रमाणे उलटल्याचे दिसूत येत आहे. चक्रिवादळाचं थैमान तुम्ही या व्हिडीओत पाहूच शकता. या वादळाने खूप लांब लचक क्षेत्र व्यापले आहे. हे चक्रीवादळ इतके धोकादायक आणि वेगवान आहे की त्यात माणसाचं टिकून राहणं अवघड आहे, मग चार चाकी गाड्यांची तर लांबची गोष्ट आहे. या वादळाच्या कचाट्यात एक ट्रक सापडल्याचं दिसून येतंय. वादळाचा वेग इतका आहे की यात ट्रक वादळी वाऱ्यामुळे गाडी गोल गोल घिरक्या घेऊ लागला. जवळजवळ ३६० डिग्रीमध्ये हा ट्रक गोल फिरू लागला. काही वेळाने हा ट्रक पुन्हा सरळ झाला. वादळ दूर जाताच कार चालकाने ताबडतोब आपला ट्रक आरामात रस्त्यावरून चालवत निघून गेला.
आणखी वाचा : मोबाईलच्या नादात पोटच्या गोळ्यालाच विसरली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल
ही घटना एका व्यक्तीने दुरूनच आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला. वादळात अडकलेल्या या ट्रक चालकाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड रंगू लागली. या व्हायरल व्हिडीओनंतर आता शेवरले कंपनीने पुढे येत एक घोषणा केली. या वादळात ट्रकचं मोठं नुसकान झालं होतं. डलास न्यूज स्टेशन KXAS सोबत बोलताना ट्रक चालकाने त्याच्या ट्रकच्या स्थितीबाबत माहिती दिली. त्याचा ट्रक आता स्टार्ट होतोय, पण पहिल्यासारखा चालत नाही.
आणखी वाचा : सिगारेट पेटवत विषारी सापाजवळ पोहोचली मुलगी, मग काय झालं पाहा VIRAL VIDEO
ब्रूस लोरी शेवरलेट कार डीलरशिपच्या फेसबुक पेजद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे की, कंपनी या ट्रक चालकाला रेड 2022 सिल्व्हरॅडो 1500 एलटी ऑल स्टार एडिशन कार भेट देणार आहे. या कारची किंमत अमेरिकेत सुमारे ३५ लाख रुपये आहे. याची पोस्ट शेअर करत कंपनीने पोस्टमध्ये लिहिले की, “‘ट्रक चालक सुरक्षित असल्याबद्दल आम्ही निश्चिंत आहोत. अशा भीतिदायक परिस्थितीतही तो जबरदस्त गाडी चालवत होता.” शेवरलेट कंपनीकडून या ट्रक चालकाला ट्रक तर मिळालाच आहे, पण सोबतच ११ लाख ४५ हजार रूपयांचा चेक सुद्धा त्याला देण्यात आलाय. याशिवाय, डीलरशिपने घोषणा केली आहे की अमेरिकन रेड क्रॉस चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आपत्ती निवारण निधीला सुमारे ३८ लाख रुपये देण्यात येईल.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘कबीर सिंग’ चित्रपटातल्या गाण्यावर या चिमुकलीने असा काही आळवला सूर, ऐकून नेटिझन्स म्हणाले…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : इतक्या मोठ्या गेंड्याला उचलून बिबट्या झाडावर चढला, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतील टेक्सासमधला आहे. ओक्लाहोमा शहरात वादळी वाऱ्याने रस्त्यावर धावणारी वाहनेही उलटली आहेत. ३० वर्षांतील सर्वात विनाशकारी वादळ सांगण्यात येतंय. हे वादळ किती भयानक आहे, याची कल्पना हा व्हायरल व्हिडीओ पाहूनच येते.
व्हायरल व्हिडीओमधला ट्रक चालक १६ वर्षीय रिले लियोन हा Whataburger येथे नोकरीच्या मुलाखतीसाठी गेला होता. तिथून परतत असताना त्याला नोकरी मिळाल्याचा एक फोन देखील आला आणि त्यानंतर काही मिनिटांत तो वादळाच्या कचाट्यात सापडला. सारं काही इतकं वेगाने घडलं की काय करावं हेच सुचेनास झालं होतं. वादळामुळे त्याची गाडी रस्त्याच्या मधोमध आली आणि तो गाडी चालवत रस्त्याच्या कडेला येण्याचा प्रयत्न करत होता.