पृथ्वीवर असे अनेक प्राणी आहेत, की जे आपण आयुष्यात कधीतरी पहिल्यांदा पाहतो. तेव्हा ते एक तर आवडतात किंवा खूप विचित्र वाटतात. काही वेळा हे प्राणी तुम्हाला मोहात पाडतात; तर काही वेळा घाबरवतातही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यातील प्राणी पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण- हा नेमका कोणता प्राणी हे लोकांनाही समजत नाहीय.
व्हायरल व्हिडीओ पाहिला, तर तुम्हाला हा प्राणी विचित्र दिसत असेल. कधी त्याची वागणूक उंदरासारखी असते; तर कधी हरणासारखी असते. सोशल मीडियावरील युजर्स हा नेमका कोणता प्राणी आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण अनेकांना तो ओळखता येणे अवघड झाले आहे. व्हिडीओतील तो प्राणी पाहिल्यास त्याचे रूप हरणासारखे दिसतेय; परंतु त्याचे शरीर उंदरासारखे खूपच लहान आहे.
हा व्हिडीओ नेचर इज अमेझिंग नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये लिहिले गेलेय की, हा एक उंदीर-हरीण म्हणजे शेवरोटिन आहे; हे जगातील सर्वांत लहान खुरांचे प्राणी आहेत. मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर युजर्सनीही आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, हा व्हिडीओ पाहण्यास खूपच क्यूट आहे. यातील प्राणी खूपच गोंडस दिसत आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, तो खरोखरच लहान आहे; पण तो हरीण आहे की उंदीर ते सांगता येत नाहीय.