Demolition Viral Video Chhatrapati Sambhajinagar: लोकसभा निवडणुकीत भाजपाला बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात बरेच धक्के बसले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजय प्राप्त झाला असला तरी मताधिक्य हे अगदी कमी असल्याचे हा धक्काच होता. शिवाय ज्या अयोध्या नगरीच्या राम मंदिराच्या बळावर भाजपाने मत मागितलं त्याच अयोध्यावासियांनी भाजपाच्या उमेदवाराला डावलून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करून दिलं. या धक्कादायक निकालानंतर साहजिकच सोशल मीडियावर स्वयंघोषित तज्ज्ञांनी असं का झालं असावं याचे अंदाज व्यक्त केले. हे अंदाज व्यक्त करतानाच काही व्हिडीओजचा सुद्धा आधार घेण्यात आला. पण व्हिडीओजची नीट पडताळणी न केल्याने आता काही गोष्टी नव्याने समोर येत आहेत.

लाइटहाऊस जर्नालिज्मला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अतिक्रमण मोहिमेचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आढळून आले. वापरकर्ते दावा करत होते की व्हिडीओ अयोध्येचा आहे. व्हिडीओमध्ये काही नागरिक रडताना दिसतायत. यात हातात लहान बाळ घेऊन रडणारी एक महिला फार स्पष्टपणे दिसतेय. हे दृश्य तसे फारच वेदनादायक आहे पण यात कॅप्शनमध्ये अनेकांनी असा दावा केला आहे की लोकांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत मग अयोध्या कशी जिंकता येईल? या कॅप्शनमधून काहींनी असं सुचवण्याचा प्रयत्न केलाय की हा व्हिडीओ मुळात अयोध्येचा आहे. पण आमच्या तपासात या व्हिडीओची खरी बाजू दिसून आली आहे.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
pune dumper crushed people on footpath
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Two bike riders die three injured in two separate accidents in Pune city
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तिघे जखमी

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Hansraj Meena ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि अनेक कीफ्रेम मिळवून आमचा तपास सुरु केला. त्यानंतर आम्ही कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च केले. यामुळे आम्हाला २६ फेब्रुवारी २०२४ ला X वर केलेली एक पोस्ट आढळून आली.

यामुळे आम्हाला कळले की ही घटना जुनी आहे. या व्हिडिओवर ‘जयहिंद शकील खान’ नावाचा वॉटरमार्क होता.

आम्हाला इंस्टाग्रामवर या वापरकर्त्याचे प्रोफाइल सापडले. आम्हाला आढळले की वापरकर्ता लोकमत समूहाचा फोटो पत्रकार आहे. त्यांच्या प्रोफाइलमध्ये गेल्यावर आम्हाला इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली रील सापडली.

या प्रोफाइल वर अशी अजून एक रील होती

वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर पोस्ट केलेल्या एका वृत्तात असे सुचवण्यात आले आहे की ही अतिक्रमण मोहीम मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती संभाजी नगर (आधीचं औरंगाबाद) येथून विश्रांती नगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या वर्षी २२ फेब्रुवारी रोजी बातमी पोस्ट केली होती.

आम्हाला या घटनेबाबत अजून बातम्या मिळाल्या.

https://www.lokmattimes.com/aurangabad/chh-sambhajinagar-citizens-pelt-stones-at-officials-during-encroachments-removal-police-deploy-tear-a514
https://www.freepressjournal.in/pune/video-police-resort-to-lathi-charge-as-anti-encroachment-drive-turns-violent-in-chhatrapati-sambhajinagar

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही शकील खान यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांनी आम्हाला सांगितले की त्याने छत्रपती संभाजी नगर येथे २२ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण मोहिमेचा व्हिडीओ काढला होता.

हे ही वाचा<< अकासा एअरच्या विमानात संस्कृतमध्ये घोषणा? Video पाहून नेटकऱ्यांना वाटतोय अभिमान पण ‘ही’ गोष्ट राहिली दुर्लक्षित

निष्कर्ष: महाराष्ट्रातील जुना व्हिडीओ, निवडणूक निकालानंतर अयोध्येमधील असल्याचा सांगून व्हायरल होत आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

Story img Loader