Viral Video : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण गड किल्लांवर जाऊन महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. शिवप्रेमीं मनापासून शिवगर्जना करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करताना गर्जना करताना दिसत आहे. तरुणाची शिवगर्जना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडीओ एका महाविद्यालयातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अनेक तरुण मंडळी घोळका करून उभी आहेत.अचानक एक तरुण शिवगर्जना करायला सुरूवात करतो. शिवगर्जना करताना हा तरूण म्हणतो, “छत्रपती शिवाजी महाराज की..” त्यावर बाकीचे तरुण मोठ्याने जय म्हणतात त्यानंतर तो तरुण पुन्हा म्हणतो, ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की..” त्यावर सुद्धा बाकीचे तरुण मोठ्याने जय म्हणतात. शेवटी हा तरुण हर हर महादेवचा दोनदा जयघोष करतो. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येईल.

हेही वाचा : VIDEO : मेट्रोचं दार बंद होणार अन् चोराने डाव साधला! क्षणात हिसकावला मोबाईल; बिचारा तरुण पाहातच राहिला

shreeraj_45_sawant या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “छत्रपती” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा आला भावा… जय शिवराय, जय शंभूराजे.. हर हर महादेव..” तर एका युजरने लिहिलेय, “आवाज खूप पहाडी आहे.. एकदम भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा उभा राहिला. डोळ्यात पाणी आणलं राव. खरच जय शिवराय दादा”