Purandar Fort : राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा अशी ओळख असणारा सह्याद्री महाराष्ट्राचा अभिमान आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांना लाभलेले सौंदर्य आणि त्यावरील किल्ले अनेकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे. जगभरातील पर्यटकांनासह देशातील, महाराष्ट्रातील अनेक लोक नेहमीच पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी या गडकिल्ल्यांना भेट देतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची सफर करतात. गडकिल्ल्यांना भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला दिसेल ती अंध मुला-मुलींनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुरंदर किल्ला सर केला आहे.

मुंबईतील रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेली ‘नयन फाउंडेशन’ ही संस्था गेली १५ वर्षे अंध मुला-मुलींना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांची सफर घडवून आणते. यंदा त्यांनी ४८ अंध बांधवांना पुरंदर किल्ल्याची सफर घडवून आणली आहे.

Funny video of husband tshirt funny quote viral on alcohol husband wife funny reel
“प्रिय बायको तुझा विश्वास…”, बापरे! नवऱ्याने बायकोसाठी टी-शर्टच्या मागे काय लिहिलं पाहा; वाचून पोट धरून हसाल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mumbai local kelvan video what is kelvan why kelvan is done before maharashtrian wedding kelvan ideas
मुंबईकर महिलांचा नाद नाय! ट्रेनमध्ये थाटात केलं केळवण; धावती ट्रेन पंचपक्वान्न अन् आनंद; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
थेट विरार लोकलवर चढली महिला! कारण वाचून व्हाल अवाक्, पाहा VIDEO
zee marathi paaru and lakshmi niwas mahasangam new twist
लग्न, गैरसमज अन् कारस्थान…; ‘झी मराठी’च्या दोन मालिकांचा महासंगम! आठवडाभर काय घडणार? वाचा…
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Sharad Pawar and Uddhav Thackeray candidate list for vidhan sabha Election
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात दिला उमेदवार, वाद होण्याची शक्यता?

पाहा पोस्ट

मुंबईतून शनिवारी २५ जानेवारी रोजी या मुलांनी पुरंदर किल्ल्याकडे प्रयाण करत रविवारी सकाळी ही मुले किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचली. दृष्टी नाही पण गाठीला इच्छाशक्ती याच जोरावर ‘त्या’ ४८ साहसवीरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्याची वाट पकडली. पाठीवर सॅक, पायात बूट, डोक्यावर टोपी आणि प्रत्येकाच्या जोडीला मदतीचा एक हात अशा पद्धतीने ही साखळी तयार करण्यात आली. प्रजासत्ताकदिनानिमित्त तिरंगा ध्वजाला मानवंदना देत या सर्वांनी गड चढायला सुरुवात केली. हे ४८ साहसवीर आणि त्यांच्यासाठी तेवढेच मदतीचे हात बरोबर घेत मोहीम सुरू झाली.वाटा-आडवाटांवरील घसरणे-पडणे-सावरणे सुरू झाले. खड्डे, चढउतार यांचा अंदाज घेत पावले टाकली जात होती. बरोबरच्या मदतनिसांकडून प्रत्येक पावलाबाबत मार्गदर्शन केले जात होते. अशी ही दमछाक करणारी, आव्हान वाटणारी दृष्टिहीन गिर्यारोहकांची मोहीम हळूहळू गडाच्या माथ्याच्या दिशेने सरकू लागली. डोळ्यांसमोर केवळ अंधार आणि आधारासाठी केवळ एक हात यावर या ४८ पायांनी केवळ अडीच तासांमध्ये त्यांनी ४४७० फूट उंचीच्या दुर्गशिखराचा माथ्याला स्पर्श केला आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला.

purandar fort
purandar fort

गडात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. मग तिथल्या चिऱ्यांना स्पर्श करत, गडाचा इतिहास उलगडू लागला. दिवसभर इतिहास, भूगोल, गिर्यारोहणाच्या या आडवाटेवर भटकंती केल्यावर भारतमातेचा जयजयकार करत या मोहिमेचा शेवट झाला. राष्ट्रगीत झाले आणि एक आगळावेगळा दिवस अनुभवत हे सर्व खरेखुरे साहसवीर गड उतरू लागले. ज्यांच्यासाठी खरेतर दैनंदिन जीवनदेखील एखादे गिर्यारोहण असते अशा या दृष्टिहीन पावलांनी धडधाकट शरीरांना लाजवेल अशी कामगिरी केली होती. गड उतरताना त्यांच्या चेहऱ्यावर याच पराक्रमाचे स्मितहास्य उमटलेले होते. त्यांच्या जिद्दीला आत्मविश्वासाचे बळ प्राप्त झाले होते.

प्रत्येक ऋतूमध्ये किल्ल्याचे सौंदर्य वेगवेगळे असते. मात्र नेत्रहिनांना त्याचा लाभ घेता येत नाही. अंध व्यक्तींची ही खंत लक्षात घेऊन आतापर्यंत या संस्थेच्या मदतीने अंध बांधवांनी रायगड, सिंहगड, राजगड, रायरेश्वर, सज्जनगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसूबाई सर केले आहे. समाजातील अंध, मुकबधिर आणि दिव्यांग बांधवाना नेहमी मदत करणे हे प्रत्येक सुजाण नागरीकाचे कर्तव्य आहे./

Story img Loader