लालबाग हे लालबागचा राजा नावाने असलेल्या गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले असतात. गणपती मंडपात बसल्यावर भक्तिभावाने रांगा लावून, अनेक जण ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतात आणि आपल्या मनातील इच्छा, व्यथा मांडतात. परंपरा आणि संस्कृती जपणारा लालबाग – परळ परिसर अनेक गणेशभक्तांची पहिली पसंती आहे. म्हणून लाखोंच्या संख्येने अनेक जण येथे दर्शनासाठी येतात आणि आपली इच्छा देवासमोर व्यक्त करताना दिसून येतात. दोन दिवसांपूर्वीच सगळ्या गणेशभक्तांच्या लाडक्या ‘लालबागचा राजा’चे आगमन झाले आहे. ‘लालबागचा राजा’च्या प्रथम दर्शनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला होता. त्याची खास झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन दाखवण्यात आले आहे. शुक्रवारी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. तसेच लालबागच्या राजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी अनेक तरुणी नऊवारी नेसून, तर तरुण पांढरा सदरा घालून उत्तम सादरीकरण करताना दिसले. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष सुरू होताच पडदा हळूहळू वर जातो आणि लालबागच्या राजाची खास झलक दाखवण्यात येते. लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

हेही वाचा… ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याचं विदेशी व्हर्जन पाहिलत का? साईराजप्रमाणे ‘या’ चिमुकलीच्या गोंडस अभिनयाची नेटकऱ्यांना पडली भुरळ

व्हिडीओ नक्की बघा :

‘लालबागचा राजा’चे प्रथम दर्शन :

लालबागच्या राजाचा मंडप हा रायगडाच्या प्रतिकृतीमध्ये सादर करण्यात आला आहे. ‘लालबागचा राजा’चे यंदा ९० वे वर्ष आहे. त्यासाठी खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. या सादरीकरणादरम्यान बाप्पाची दाखवण्यात आलेली पहिली झलक पाहून सुखावल्याने तुमचेही अंग नक्कीच शहारेल आणि तुम्ही ही झलक पुन्हा पुन्हा बघाल. फक्त मुंबईच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात.

लालबागच्या राजाची पहिली झलक सोशल मीडियावर @cusinculture व @rushij या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच हे युजर सोशल मीडियाचे डिजिटल क्रिएटर आहेत. लालबाच्या राजाची पहिली झलक पाहून लाखो भाविक “गणपती बाप्पा मोरया” असे कमेंटमध्ये लिहिताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharajs coronation ceremony was performed for the king of lalbagh asp