Pune Shiv Jayanti 2025: देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उप्रकमांनी साजरी केली जात आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील. अशातच पुण्यात साजरी होणऱ्या शिवजयंतीची सर्वत्र चर्चा आहे. पुण्यातले शिवजयंतीचे व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, पुण्यात शिवजयंती म्हणजे विषय हार्ड ओ…
फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ५१ रणशिगांची ललकारी, नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर, हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाळ पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शनिवार वाड्याच्या बाहेरील हा व्हिडीओ असून आज दिवसभरात १०० हून अधिक मिरवणुका निघणार आहेत. त्याचीच जंगी तयारी याठिकाणी पाहायला मिळत आहे.शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे शिवजयंती निमित्ताने खास आयोजन करण्यात आले. यावेळी सलग १४ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणुका, शिवपूजन, शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे अनावरण, अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर पुण्यात येत आहेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर punerifeeds नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “पुण्यात शिवजयंती म्हणजे विषय हार्ड” असं लिहलं आहे.