छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायपूरमधील सिलतारा येथील एक घटना समोर आली आहे. एका कारखान्यात जेसीबीमध्ये हवा भरत असताना टायरचा स्फोट (JCB tire burst) झाला. या अपघातात तेथे उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ३ मे रोजी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की का झालं?

कारखान्यात एक कर्मचारी जेसीबीचा टायर काढून हवा भरत होता. हवा भरताना तो टायरवर बसून सतत हवा तपासण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर अचानकच तो टायर फुटला. हा स्फोट इतका भीषण होता की टायरजवळील दोन्ही कामगार हवेत उडले गेले. यासोबतच त्यांच्या शरीराचे काही तुकडेही आजूबाजूला विखुरले गेले.

(हे ही वाचा: वडिलांनी लग्नासाठी पाठवलेल्या मुलाला मुलीने दिली ‘ही’ खास ऑफर; चॅटची होतेय सर्वत्र चर्चा)

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

ही संपूर्ण घटना कारखान्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कारखान्यात जेसीबी उभा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच काही कर्मचारी तेथे उपस्थित आहेत. व्हिडीओमध्ये एक मजूर टायरमध्ये हवा भरत असल्याचे दिसत आहे. तिथे शेजारी उभे असलेले दोन कर्मचारी बोलत आहेत. तेवढ्यात त्यातील एकजणही येऊन हवा भरणाऱ्या कर्मचाऱ्याजवळ उभा राहतो. त्यानंतर टायरचा स्फोट होतो.

(हे ही वाचा: हा इम्रान खान आहे का? ‘जाने तू या…जाने ना’ अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण!)

(हे ही वाचा: ‘सामी-सामी’ गाण्यावर आजीने केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

मृत मध्य प्रदेशातील रेवा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. राजपाल सिंग वय ३२ वर्ष आणि प्रंजन नामदेव वय ३२अशी मृतांची नावे आहेत. ही घटना सिलतारा चौकी परिसरात घडली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh blast in jcb tyre two workers died entire incident caught on cctv ttg